सांगली जिल्हात 35 वर्षीय कोरोना बाधित महिलेची रुग्णालयात गळाफास घेऊन आत्महत्या.

66

✒सांगली जिल्हा प्रतिनिधी✒
सांगली,दि.31 मे:- सांगली जिल्ह्यातील मिरज येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिरज येथील शासकीय कोव्हिड19 रुग्णालयामध्ये हा खळबळजनक प्रकार घडला. बाथरुममध्ये गळफास घेऊन 35 वर्षीय महिलेने आयुष्य संपवलं. रुग्णालयात झालेल्या या आत्महत्येने शहरात संतापाची लाट पसरली आहे.

मिरज येथील सुभाषनगर मध्ये राहणा-या सुमन कुंभार यांना कोरोना वायरसचा संसर्ग झाल्यानंतर तिला सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय कोव्हिड केअर सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावरील उपचार सुरु होता. ही महिलेची तबीयेत मध्ये सुधार होत होता. अचानक अस काय झाल ज्यामुळे सुमन कुंभार हिने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.