आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आता ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम रुग्णालयांनी सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी शैलेश नवाल.

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी

अमरावती:- कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. ही गरज लक्षात घेऊन रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा वापर करून त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. विविध रुग्णालयांनी त्यात सहभागी होऊन युवकांना प्रशिक्षित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

जिल्ह्यात यावर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील युवक-युवतींना इस्पितळांकडे उपलब्ध असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याद्वारे प्रशिक्षित होणारे मनुष्यबळ आरोग्य यंत्रणेमध्ये कार्यरत होण्याकरिता त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय इस्पितळे, वैद्यकीय संस्था तसेच २० पेक्षा अधिक बेड्सची सोय असणारी खाजगी इस्पितळे सदर कार्यक्रमात व्यावसायिक प्रशिक्षण संस्था (VTI) म्हणून सूचीबद्ध होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत.

तसेच या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे उमेदवारांना पूर्णपणे विनामूल्य असून सूचीबद्ध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाकरिता टप्पेनिहाय प्रशिक्षण शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता इस्पितळांनी गुगल फॉर्मच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था नोंदणीसाठी आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याचा अंतिम दिनांक ३१ मे असा आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शासकीय इस्पितळे, वैद्यकीय संस्था तसेच निकषानुसार पात्र ठरणारे खाजगी इस्पितळे, वैद्यकीय संस्था आदीनी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक महितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या (0721) 2566066 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here