सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय सोळंकी यांना निरोप व सत्कार गरीबांचा डाक्टर म्हणुन ख्याती.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी:

मोवाड, ता.1:- येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय सोळंकी हे आपल्या निरंतर वैद्यकीय सेवेतुन (ता. ३१) ला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्याच दिवशी सायंकाळी ठीक ७ वाजता प्रा. आ. केंद्र मौवाडच्या वतीने त्यांना निरोप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन येथीलच प्रा. आ. केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रविण ऊमरगेकर, माजी आरोग्य सहाय्यक श्री. कोडापे, तर मोवाड येथील फार्मासिस्ट धिरज बेले, यावेळी प्रामुख्याने ऊपस्थीत होते.

दरम्यान डाॅ. ऊमरगेकर यांचे हस्ते डाॅ. सोळंकी यांचा सपत्निक शाॅल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा, आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. मयुरी सावते, डाॅ. प्रतीक राऊत, आरोग्य सहाय्यीका वैभवी शेंदरे, औषध निर्माता राजु दिवटे, आरोग्य सहाय्यक दिपक सहारे, निलेश खेडकर, क्षेत्र कर्मचारी मनोज बिले, आरोग्य सेविका दिपा गवई, नंदा रामटेके, कनिष्ट सहाय्यक श्री मुरोडीया, योगेश क्षिरसागर, तसेच किरण सेलोकर हे यावेळी प्रामुख्याने ऊपस्थीत होते.

डाॅ. सोळंकी हे वैद्यकीय सेवेत असतांनी येथील आरोग्य केंद्रात नित्यनेमे व शासनाच्या नियमाप्रमाणे आरोग्य सेवा देत असत. एवढेच नव्हे तर ते गरीब व गरजु रूग्णांसाठी आपल्या वैद्यकीय सेवेतुन वेळात वेळ काढुन ऊपचारासाठी धावुन जावचे. वेद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या याच कामाची पावती म्हणुन मोवाडच्या नागरीकांनी त्यांना गरीबांचा डाॅक्टर म्हणुन ही ऊपाधी दिली आहे.

विवेक लीखार सामाजीक कार्यकर्ते मोवाड.

कोरोना काळातही डाॅ. सोळंकी यांनी जिवाचे राण करून केंद्रातील व केंद्राबाहेरील रूग्णांना मोलाची सेवा देऊन कोरोना योध्याची भुमीका पार पाडली.

दिनदयाल वैद्य शेतकरी मोवाड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here