अहमदनगर_बलात्काराची केस मागे घे म्हणत 10 वर्षीय आदीवासी मुलीला पेट्रोल ओतून पेटवले

55

महाराष्ट्रातील अहमदनगर :- जिल्हा अनेक गंभीर गुन्ह्यांमुळे आधीच बदनाम असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे बलात्काराची केस मागे घेण्यासाठी धमकावत एका दहा वर्षाच्या आदीवासी समाजाचा मुलीला पेटवून देण्यात आलं आहे. काही दिवसा पुर्वी या आदीवासी महिलेवर बलात्कार करण्यात आला होता, तो केस परत घेण्यासाठी आरोपी या महिलेला धमकावत होता. पण काल या आरोपी ने बलात्कार पिढीत महिलेच्या दहा वर्षीय मुलीला पेट्रोल टाकुन जाळण्यात आले

ahmednagar-10-year-old-rape-case

‘बलात्काराची केस मागे घे’, असे म्हणत एका महिलेच्या दहा वर्षाच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावाच्या शिवारात गुरुवारी (१३ ऑगस्ट) घडला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून राजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा.पळवे, ता.पारनेर) यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावाच्या शिवारात माळरानावर संबंधित महिलेचे कुटुंब झोपडीमध्ये राहते. 13 ऑगस्टला संबंधित महिला व तिची दहा वर्षाची मुलगी आपल्या झोपडीमध्ये जेवण करत होत्या. यावेळी तेथे आरोपी राजाराम तरटे व अमोल तरटे हे दोघे दुचाकीवर आले. त्यानंतर त्यांनी सदर महिलेला ‘तु बलात्काराची केस मागे घे’, असे म्हणून शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संबंधित महिलेची दहा वर्षाची मुलगी झोपडीच्या बाहेर आली. त्यावेळी आरोपीने त्याच्या हातातील पेट्रोल हे महिलेच्या अंगावर फेकले असता, हे पेट्रोल त्या महिलेच्या दहा वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडले. त्यानंतर आरोपीने काडी पेटवून ती मुलीच्या दिशेने फेकली असता मुलीच्या अंगावरील फ्रॉक पेटला. या घटनेमध्ये संबंधित महिलेची दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून काल रात्री उशिरा सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास अहमदनगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.

-प्रशांत जगताप नागपुर ब्युरो चीफ