नेरी चिमूर रोडवर दुचाकी चा अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर:- नेरी रोडवर सोनेगांव (काग) जवळ चिमुरवरून परत येत असताना दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने उसेगांव येथील दादाराव सांदेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर पुरूषोत्तम चौखे हे गंभीर जखमी झाले आहे प्राप्त माहितीनुसार, 2 जुनच्या दुपारी 3 वाजताच्या दरम्यान पुरूषोत्तम चौखे व दादाराव सांंदेकर हे काही कामानिमीत्य चिमुरला गेले होते. आपले काम आटोपून चिमुरवरून परत येत असताना सोनेगांव, (काग) जवळ दुचाकीचा तोल गेल्याने दुचाकी स्वार पडले व दुचाकी चालक पुरूषोत्तम चौखे वय 40 वर्ष हे गंभीर जखमी झाले. तर दादाराव सांदेकर वय 55 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला अचानक प्रहार वाहन चालक संघटनेचे सदस्य नितेश कातुलवार हे शेतावरुन परतीला घरी येत असतांना रोडवर अपघात झाला असल्याचे आढळून आले त्यांनी त्वरित 108 ला संपर्क करून जखमीनां ऊपजील्हा रुग्णालय चिमुर येथे ताबडतोब हलविले.

या अपघाताची माहिती कुटुंबीयाना होताच ते घटनास्थळी गेले. मृत पावलेल्या देहाचे शवविच्छेदन करून 3 जुनला दादाराव सांदेकर यांचे शव कुटुंबीयाना देण्यात आले. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे. मृताच्या मागे त्यांचा मुलगा, सुन, पत्नी, नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here