बालकाला उपचारात डागण्या देऊन अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी :पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर* *मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्याचे आरोग्य यंत्रणेला निर्देश
बालकाला उपचारात डागण्या देऊन अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी :पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर* *मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्याचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

*बालकाला उपचारात डागण्या देऊन अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी :पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*

*मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्याचे आरोग्य यंत्रणेला निर्देश*

बालकाला उपचारात डागण्या देऊन अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी :पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*  *मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्याचे आरोग्य यंत्रणेला निर्देश
बालकाला उपचारात डागण्या देऊन अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी :पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*
*मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्याचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज:8208166961

अमरावती : – मेळघाटातील बालकाच्या पोटावर चटके देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. याप्रकरणी अघोरी उपचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबवावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा ३ वर्षीय बालक आठवडाभरापासुन आजारी होता. परतवाडा परिसरात आईवडील कामानिमीत्ताने असताना बालकाला धामणगाव येथील खाजगी डाॅक्टराकडे औषधोपचार केले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने या कुटूंबाने मुलाला भगतबाबाकडे नेले. भुमका बाबाने कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डागण्या दिल्या. त्यामुळे बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी इर्विन रुग्णालयाकडे धाव घेतली व बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टर व बालकाच्या आईवडलांशी संवाद साधला.

अघोरी उपचार रोखा, जाणीव जागृती करा

याप्रकरणी जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे,आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत मेळघाटात भरीव जाणीवजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी भोंदू बाबांवर कारवाई करतानाच पाड्यापाड्यावर आरोग्य यंत्रणेद्वारा कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here