नागपुरात गॅस सिलेंडरमधील लिक होऊन स्फोट, तीन घरं जळून खाक, लाखोचे नुसकान.

56

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.11 जुन:- नागपुर जिल्हात गॅस सिलेंडर लिक झाल्याने स्फोट झाला. बघता बघता आग लागली आणि त्या आगीत शेजारी असलेली तीन घरे जळून खाक झाली आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात ही भयानक घटना आज सकाळच्या सुमारास घडली.

काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात सकाळी 6 वाजताच्या सुमारास राधाबाई टूले यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने त्यांच्या घरी आग लागली. पाहता पाहता ही आग शेजारी राहणाऱ्या विठाबाई टुले, कुमुद नारायण सरोदे यांच्या घरापर्यंत पोहोचली.

या आगीत तिन्ही घरं आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दुर्दैवाने विठाबाई टुले या महिला शेतकऱ्याने खरीप हंगामासाठी बियाणे आणि खत घेण्याकरिता जमा केलेले 50 हजार रुपये देखील या आगीत जळून खाक झाले आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार या आगीत तब्बल 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.