Home latest News वसई विरार वंचितच्या कॊरोना योद्धांचा सत्कार, अनेकांना दिला मदतीचा हात.

वसई विरार वंचितच्या कॊरोना योद्धांचा सत्कार, अनेकांना दिला मदतीचा हात.

39

  मुंबई, ब्युरो चीफ प्रतीनिधी✒
नालासोपारा. दि.12:- वंचित बहुजन आघाडीच्या वसई विरार महानगरपालिकेच्या सचिव रेणुका जाधव व दिलिशा वाघेला यांचा नुकताच कोरूना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. मालाड येथील महानगरपालिकेचे अधिकारी आनंद मालाडकर यांच्या हस्ते हा सत्कार झाला.

रेणुका जाधव व दिलिशा वाघेला या वसई-विरार महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. कॊरोना मुळे राज्यात रुग्ण संख्या वाढल्यानंतर रुग्णांना बेड कमी पडू लागले. अशा रुग्णांची गरज लक्षात घेऊन वाघेला व रेणुका जाधव यांनी रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड त्याचप्रमाणे आयसीयू उपलब्ध करून दिले. त्यांच्या खाण्यापिण्याची तसेच चहा पाण्याची सोय करून दिली. रुग्णवाहिकेची गरज असणाऱ्यांना रात्री-अपरात्री रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्याची दखल घेत मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आनंद मालाडकर यांनी वाघेला व रेणुका जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

संकलन सुरेश नंदिरे, मुंबई