खाद्यतेल दरवाढीवर गरीब, सामान्यांची मोर्चेबांधणी; खाद्यतेलाचे भाव कमी करा सर्वसामान्य नागरिकांची मागणी.
खाद्यतेल दरवाढीवर गरीब, सामान्यांची मोर्चेबांधणी; खाद्यतेलाचे भाव कमी करा सर्वसामान्य नागरिकांची मागणी.

खाद्यतेल दरवाढीवर गरीब, सामान्यांची मोर्चेबांधणी; खाद्यतेलाचे भाव कमी करा सर्वसामान्य नागरिकांची मागणी.

खाद्यतेल दरवाढीवर गरीब, सामान्यांची मोर्चेबांधणी; खाद्यतेलाचे भाव कमी करा सर्वसामान्य नागरिकांची मागणी.
खाद्यतेल दरवाढीवर गरीब, सामान्यांची मोर्चेबांधणी; खाद्यतेलाचे भाव कमी करा सर्वसामान्य नागरिकांची मागणी.

साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ :-  जिल्ह्यातील सर्वत्र मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊन  व संचारबंदीमुळे शेतकरी -शेतमजूर, लघु, व्यवसायिक, गरीब कामगार, सर्वसामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत युद्धपातळीवर लढत हवालदिल झाला आहे यातच शासनाने सोयाबीन खाद्यतेलाचे भाव दामदुप्पट पेक्षा दरवाढ केले आहे याबाबत सर्व स्तरावरून शासन विरोधी निषेध व्यक्त करीत तात्काळ एक वर्षांपूर्वीचे दर कायम करण्याकरिता मोर्चेबांधणी सुरु असल्याचे नागरिकांनी माहिती देतांना सांगितले 

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्यभूमीवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे लॉकडाऊन व संचारबंदी आदेशाचे पालन करून सर्व उद्योगधंदे, लघु व्यवसाय बंद करून घराबाहेर न जाण्याच्या सूचनेला येथील शेतकरी -शेतमजूर गरीब कामगार सर्व सामान्य नागरिकांनी वेळोवेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कधीकाळी अनेकांनी थाळ्या, टाट टाटी, घंटी आणी कधी घरावर तर काहींनी घराबाहेर दिवे लावले.
यामुळे नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी न होता उलट झपाट्याने वाढत राहिला आणि दुसऱ्या टप्यात मृत्यूचा तांडव सुरु झाला. या दरम्यान सर्वत्र नागरिकांत दहशत निर्माण होऊन शासकीय आरोग्य विभागाच्या निष्क्रिय धोरण व अमलबजावणीमुळे आरोग्य उपचाराच्या समस्यांना येथील हजारो नागरिकांना तोंड देत तारेवरची कसरत करावी लागली तर काहींना जीवाला मुकावे लागले. 
आजही येथील प्रत्येक व्यक्ती कोरोना रोगाच्या दहशती मध्ये धास्तावला असून विविध समस्यांचा डोक्यावर ओझा ओढीत आहे. बेरोजगारी मुळे अनेक सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर व गरीब कामगार आर्थिक विवंचनेत संपुर्ण हवालदिल झालेले असतांना सरकारने दिव्या ऐवजी मोठा टेंभा लावून पेट्रोल, डिझेल, खते, बियाणेसह नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा उदरनिर्वाहाच्या वस्तू आणि सामग्री भरमसाट, दरवाढ करीत किराणा आणि सोयाबीन खाद्य तेलावर दाम दुप्पटी पेक्षा अधिक 70 ऐवजी 160 रुपये किलोग्राम भाव केले आहे. परिणामी गर्भश्रीमंत, कर्मचारी, कंत्राटदार, राजकारणी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, पाटील, आमदार, सावकार -खासदार यांना दरवाढ व महागाईचे काहीही झळ पोहचली नसेल परंतु सर्वसामान्य गरीबकामगार, लघु व्यवसायिक, शेतकरी, मजूर यांचे काय?  त्यांचे तर डोळे पांढरे होऊन डोक्यावरील, केस गळायला लागले आहे हे खरे….! यामुळे बहुतांश नागरिकांनी सर्व स्तरावरून शासनाच्या दरवाढी बद्दल निषेध व्यक्त करीत तात्काळ दरवाढी बद्दल निषेध व्यक्त करीत तात्काळ दरवाढ कमी करून सोयाबीन खाद्य तेलाचे एक वर्षां पूर्वीचे दर कायम करण्यातकरिता मोर्चेबांधणी करण्याचे संकेत दिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here