*तौक्ते वादळग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर.*

48

*तौक्ते वादळग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर.*

*तौक्ते वादळग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर.*
*तौक्ते वादळग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर.*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961

चंद्रपूर: -तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
वादळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ४ दिवसीय कोकण दौरा केला होता.नागरिकांसोबत संवाद साधून माहिती घेतली होती .
नुकसानीची पाहणी करत असताना वादळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करून वादळग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती.
या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
नुकसानीसाठी मदत व इतर अनुद्येय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
“तौक्ते” चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदतीचे वाटप करण्यासाठी नागपूर विभागासाठी ४४ लाख २६ हजार, अमरावती विभागासाठी ३कोटी५७ लाख ३७ हजार, औरंगाबाद विभागासाठी ९० हजार, नाशिक विभागासाठी १० कोटी ९७ लाख ६७हजार, पुणे विभागासाठी ३कोटी २४ लाख २५ हजार , कोकण विभागासाठी १५२ कोटी ४८ लाख २८ हजार याप्रमाणे एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार इतका निधी मंजूर झाला आहे. कोकण दौऱ्यावर असताना दिलेला शब्द करता आल्याचे आनंद आहे .