*महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून समाजात वेगळा आदर्श निर्माण करावा :- गजानन जुमनाके Gajanan Jumnake
*कवठाळा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना चेकद्वारे कर्ज वाटप*

*कवठाळा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना चेकद्वारे कर्ज वाटप*
✒संतोष मेश्राम✒
राजूरा तालुका प्रतिनिधी
मिडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो नं 9923497800
कोरपना :- तालुक्यातील कवठाळा येथे चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना कर्ज वाटप करण्यात आले. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत व्यावसायिक क्षेत्राकडे प्रगितीचे पाऊल टाकत समाजात वेगळा आदर्श निर्माण करावा. असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले.
यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांच्या हस्ते महिलांना चेकद्वारे कर्ज वाटप करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ममताजी जाधव व बँकेचे कर्मचारी वृंद आणि मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला यावेळी उपस्थित होत्या.