मराठा आरक्षणासंबधी केंद्र सरकारनं दाखल केलेली पूनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.

नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
           9136879930

मुंबई,दि.1 जुलै:- सध्या संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय खुप गरम झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर खुप दबाव तंत्राचा वापर मराठा समाजा कडुन सुरु झाला आहे. पण महाराष्ट्रा साठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्रातील मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पूनर्विचार याचिका
सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. पाच न्यायाधीशाच्या बेंचनं जो निर्णय़ दिला होता तोच निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 102 व्या घटनादुरुस्तीबाबत ही पुनर्विचार याचिका होती. ह्याच घटनादुरुस्तीनुसार राज्यांना एसईबीसी अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. त्यावर शिक्कामोर्तब झालंय. महाराष्ट्र सरकारनं एसईबीसी कायद्याअंतर्गतच मराठ्यांना आरक्षण दिलेलं होतं. पण तो कायदाच सुप्रीम कोर्टानं हाणून पाडला होता. एवढंच नाही तर एसईबीसी अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असल्याचं म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here