यवतमाळ जिल्हात प्रशासनाचे निर्बंध असतानाही दुकाने सुरु ठेवणे पडले महागात, 5 व्यवसायीकाना दंड.

✒साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
9309747836
यवतमाळ,दि.4 जुलै:- कोरोना वायरस महामारीच्या प्रादुर्भावाने संपुर्ण राज्यात काही निर्बंध लावले आहे. पण काही दुकानदार या प्रशासनाच्या निर्बंधाचा फज्जा उडवत असल्याचे चित्र यवतमाळ मध्ये दिसून येत आहे.

शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने शनिवार आणि रविवार ला बंद असेल अशे
निर्बंध असताना अत्यावश्यक सेवा नसतानाही मुख्य बाजारपेठेतील छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. अशा पाच दुकानदारांवर महसूल विभाग व नगरपालिका यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी ही कारवाई केली. त्यात प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

डेल्टा प्लस व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने मिशन बिगेनअंतर्गत दुपारी चार वाजेनंतर लॉकडाउन लागू केलेले आहे. सोबतच शनिवार व रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, यवतमाळ शहरातील काही नागरिक व काही व्यापार्यांणकडून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेदेखील सुरू आहेत. म्हणूनच महसूल पथकाने अशा दुकानदारांविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी शहरात मेनलाइन परिसरातील हार्डवेअर, शिलाई मशीन, जनरल स्टोअर्स अशी पाच दुकाने सुरू होती. म्हणून या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. या पाच दुकानदारांकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे, डॉ. विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. या पथकात देवा ठवकर, शंकर घोडे, नीरज सहारे, महेश चौधरी, नितीन ठाकरे, घुले यांच्यासह महसूल, नगरपालिका व पोलिस विभागातील कर्मचारी सहभागी झालेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here