जळगाव बायको बाळतपणाकरिता माहेरी गेली; गिरणा नदीत पडून नव-याचा मृत्यू.
जळगाव बायको बाळतपणाकरिता माहेरी गेली; गिरणा नदीत पडून नव-याचा मृत्यू.

जळगाव बायको बाळतपणाकरिता माहेरी गेली; गिरणा नदीत पडून नव-याचा मृत्यू.

जळगाव बायको बाळतपणाकरिता माहेरी गेली; गिरणा नदीत पडून नव-याचा मृत्यू.
जळगाव बायको बाळतपणाकरिता माहेरी गेली; गिरणा नदीत पडून नव-याचा मृत्यू.

                  मिडिया वार्ता न्यूज 
              जळगाव जिल्हा प्रतिनिधी
               ✒ विशाल सुरवाडे ✒

जळगाव,दि.4 जुलै:- जळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या गिरणा नदीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नदीत बुडाल्याने मृत्यू झालेल्याचे नाव शुभम उर्फ भवरलाल हिरालाल राजपूत वय 26 वर्ष, रा.हिरा शिवा कॉलनी असे आहे. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास निमखेडी शिवारात घडली. शुभम याला पोहता येत नसल्यानेच त्याचा जीव गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शुभमच्या मृत्यूची घटना समजताच शेकडोच्या संख्येने तरुणांनी रुग्णालयात धाव घेतली. मित्र व कुटुंबाचा प्रचंड आक्रोश सुरु होता.

प्राप्त माहितीनुसार, शुभम हिरालाल राजपूत हा शनिवारी आपल्या मित्रांबरोबर निमखेडी शिवारातील गिरणा नदीत गेले होता. तेथे काही लोक पाण्यात पोहत होते, शुभम याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात जायला घाबरत होता. पाण्यात उतरल्यावर खोल खड‌्डयाचा अंदाज न आल्याने त्यातच तो बुडाला. शेजारी पोहणारे तरुण व सोबतच्या मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने शासकीय रुग्णालयात आणले. रस्त्यात त्याचा श्वास सुरु होता. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटातच शंभराच्यावर तरुणांनी रुग्णालय गाठले. अनेक मित्रांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. कुटुंबातील महिलांचा तर प्रचंड आक्रोश सुरु केला.

मृतक शुभम याचे 1 वर्षा अगोदर लग्न झाले होते. पत्नी प्रतिक्षा गरोदर असून माहेरी एरंडोल येथे बाळतपणासाठी गेलेली होती. महिनाभरात तीचे बाळतपण होणार आहे. बाळाचा जन्म होण्याआधीच त्याचे पितृछत्र हरपले आहे. तर शुभम देखील बाळाचे तोंड बघू शकला नाही. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. शुभम याचा वाळूचा व्यवसाय होता, असे रुग्णालयात आलेल्या त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here