मुलीचा पहिला वाढदिवस आनंदात पार पडला, आईने लावला गळफास, आईचे पाय पकडून चिमुकली रडत होती.
मुलीचा पहिला वाढदिवस आनंदात पार पडला, आईने लावला गळफास, आईचे पाय पकडून चिमुकली रडत होती.

मुलीचा पहिला वाढदिवस आनंदात पार पडला, आईने लावला गळफास, आईचे पाय पकडून चिमुकली रडत होती.

मुलीचा पहिला वाढदिवस आनंदात पार पडला, आईने लावला गळफास, आईचे पाय पकडून चिमुकली रडत होती.
मुलीचा पहिला वाढदिवस आनंदात पार पडला, आईने लावला गळफास, आईचे पाय पकडून चिमुकली रडत होती.

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
95275 26914
नागपूर,दि.4 जुलै:- नागपूर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. 1 वर्षाच्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस घरात आनंदात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळच्या सर्व नातेवाइकांना बोलवीण्यात आले. पहिलावहिला वाढदिवस असल्याने सर्व आनंदात होते. सर्व मिळुन केक कापला नातेवाइकांनी एक वर्षाच्या चिमुकलीला गीफ्ट दिले. रात्री सगळ्यांनी जेवण केले. यानंतर घरी थांबलेले नातेवाईक झोपले. आणि मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे सर्वाना एकच धक्का बसला. या घटनेमुळे सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नागपुर येथील कामठी पोलीस सटेशनच्या हद्दीत सोनाली चित्तारी वय 27 वर्ष हिचे दोन वर्षांअगोदर नागेश चित्तारीसोबत लग्न झाले होते. पती नागेश हा फ्लॅक्स बोर्ड तयार करण्याचे काम करतो. सोनालीचे वडील अरुण सहारे हे ग्रामीण पोलिस विभागात नोकरीवर आहे. दोघांचा सुखी संसार सुरू होता. दोघांच्याही संसारवेलीवर चिमुकलीच्या रूपाने फूल उगवले. पाहता पाहता ती वर्षभराची झाली. यामुळे कुटुंबीयांनी बुधवारी मोठ्या थाटात आपल्या 1 वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या मुलीचा पहिलाच वाढदिवस असल्याने आई – वडिलांनी वाढदिवसाचे चांगल्या प्रकारे आयोजन केले. आपल्या जवळच्या सर्व नातलगांना निमंत्रण पाठवण्यात आले. सर्व नातलग कार्यक्रमाला आले. सर्व नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात वाढदिवस साजरा झाला. यानंतर सर्वानी मिळुन जेवणाचा आस्वाद घेतला. आणि नातेवाईक रात्री सोनालीच्या वडिलांकडे झोपायला गेले मात्र, रात्री दोन वाजता सोनाली चिमुकलीला घेऊन घरी गेली आणि गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि गुन्हा दाखल केला. तसेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

बुधवारी थाटात वाढदिवस साजरा केल्यानंतर नातेवाईक सोनालीच्या वडिलांकडे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी घरी जाण्यापूर्वी त्यांनी सोनालीची भेट घेण्याचे ठरवले. मात्र, ती आपल्या घरी गेल्याचे त्यांना समजले. गुरुवारी सकाळी नातेवाईक अरुण यांच्यासह सोनालीच्या घरी गेले. त्यांनी आवाज दिल्यानंतरही सोनालीकडून प्रतिसाद मिळाला नाही. वेळ दार ठोठावल्यानंतर धक्का मारून दार तोडले असता सोनाली गळाफास घेऊन लटकलेल्या स्थितीत दिसली.

दोन वर्षांपूर्वी आले होते भरत टाउनमध्ये राहायला
नागेश आणि सोनाली यांनी लग्न केल्यानंतर दोन वर्षांनी भरत टाउन येथे सोनालीच्या वडिलांच्या घरामागे भाड्याने राहायला आले होते. बुधवारी त्यांनी मुलींचा थाटात वाढदिवसही साजरा केला. मात्र, गुरुवारी रात्री दोन वाजता सोनालीने गळफास लावून आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. तिची एक वर्षाची चिमुकली मुलगी पायाशी झोंबून रडत होती. हे दृश्यल पाहून अनेकांना हळहळले. काही तासांपूर्वीच चिमुकलीचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here