भडगांव येथील जवान निलेश सोनवणे हे लेह लद्दाख येथे शहीद  

59

भडगांव येथील जवान निलेश सोनवणे हे लेह लद्दाख येथे शहीद

भडगांव येथील जवान निलेश सोनवणे हे लेह लद्दाख येथे शहीद   
भडगांव येथील जवान निलेश सोनवणे हे लेह लद्दाख येथे शहीद
 
        मिडीया वार्ता न्यूज

    भडगाव तालुका प्रतिनिधी

        ✍ मंगेश पाटील✍ 

जळगाव जिल्ह्य़ातील भडगाव तालुका येथील टोणगाव भागातील जवानाचा लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना शहिद झाले. नीलेश रामभाऊ सोनवणे (वय २९) असे या वीर जवानाचे नाव आहे.

भारतीय सैन्य दलाकडून शनिवारी दुपारी नीलेश सोनवणे यांच्या कुटुंबीयांना ही दु:खद बातमी कळविली. नीलेश यांच्या वीरमरणाची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ व युवकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली होती.

नीलेश सोनवणे यांच्या पश्चात आई व पाच भाऊ आहेत. सोनवणे यांच्या घरात सैन्य दलाची परंपराच आहे. त्यांचे दोन मोठे भाऊ बाळासाहेब सोनवणे व रावसाहेब सोनवणे हे मुंबई पोलीस दलात सेवेत आहेत.

तर एक भाऊ गावात पेंटिंग व्यवसाय करतो. नीलेश सोनवणे यांचे पार्थिव हे 12 जुलै सोमवारी सकाळी भडगाव येथे आणले जाण्याची शक्यता आहे.