रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) पक्षात राष्ट्रीय प्रवक्ता पदावर हर्षवर्धन ढोके यांची नियुक्ती’*

*’रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) पक्षात राष्ट्रीय प्रवक्ता पदावर हर्षवर्धन ढोके यांची नियुक्ती’*

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) पक्षात राष्ट्रीय प्रवक्ता पदावर हर्षवर्धन ढोके यांची नियुक्ती'*
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) पक्षात राष्ट्रीय प्रवक्ता पदावर हर्षवर्धन ढोके यांची नियुक्ती’*

युवराज मेश्राम✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲95275 26914📲

नागपूर : – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर)चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपकभाऊ निकाळजे व पक्षाचे सरचिटणीस डॉ. मोहनलाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा सुनिताताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे हर्षवर्धन ढोके (नागपूर) यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता या मुख्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या सभेला पक्षाचे विदर्भातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हर्षवर्धन ढोके हे एक प्रसिद्ध लेखक असून रिपब्लिकन विचारवंत म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. बऱ्याच वर्तमान पत्रात हर्षवर्धन ढोके यांनी स्तंभलेखक म्हणून काम केले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात पाहिल्यांदाच तरुण असलेले हर्षवर्धन ढोके यांची पक्षात राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती झाल्यामुळे रिपब्लिकन चळवळीला एक नवी ऊर्जा मिळेल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे. खासदार रामदास आठवले यांनी रिपाई (आंबेडकर) हा पक्ष सोडल्यामुळे पक्षात नवीन लोकांना संधी देण्यात येत आहे. खासदार रामदास आठवले यांनी त्यांचा वयक्तिक नवीन रिपाई (आठवले) गट स्थापण केला आहे. या सभेत 2024 ला निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभेच्या पूर्ण जागा महाराष्ट्रात लढविण्याचे एकमताने ठरल्या गेले.

यानिमित्ताने भीमराव डोंगरे (जिल्हाध्यक्ष), विनोद थुल (शहर अध्यक्ष), कृष्णा गवईकर(ग्रामीण जिल्हाध्यक्ष),वसंत रामटेके(ग्रामीण उपाध्यक्ष), सुरेश लांजेवार(ग्रामीण सरचिटणीस), राजू लांजेवार (ग्रामीण सचिव),संजय बागडे (ग्रामीण कोषाध्यक्ष), रत्नाकर मेश्राम, राहुलभाऊ गायकवाड,राजेंद्र भोवते, पंकज बन्सोड, पंकज भोवते, आशाताई धर्मापाल पाटील(महिला जिल्हाध्यक्ष),बबिताताई प्रमोद दाभे (महिला उपाध्यक्षा), ललिताताई बबन सोमकुवर(महिला सचिव),वंदनाताई गजभिये, दुर्गाताई लांजेवर, कल्पनाताई वाहणे, सावित्रीताई गौरखेडे, छायाताई धुर्वे (जिल्हाध्यक्षा,आदिवासी बिरसा मुंडा फ्रंट), प्रीतीताई खुलगे (ओबीसी महिला आघाडी), प्रमोद ढोके (जिल्हा प्रवक्ता), अरुण वाहणे (कवाडे गट, जिल्हा कोषाध्यक्ष) जिल्हा समिती सदस्यांनी हर्षवर्धन ढोके यांचे अभिनंदन केले.