रामपूर टी पॉईंटवर अवैद्य ट्रकांची पार्किंग पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष*

*रामपूर टी पॉईंटवर अवैद्य ट्रकांची पार्किंग पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष*

रामपूर टी पॉईंटवर अवैद्य ट्रकांची पार्किंग पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष*
रामपूर टी पॉईंटवर अवैद्य ट्रकांची पार्किंग पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष*

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजूरा,शहरालगत असलेल्या रामपूर टी पॉईंट येथे सास्ती-गोवरी जोड रस्ता आहे या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केलेली असतात यामुळे वळण रस्तावरून ये-जा करणाऱ्यांना समोरील वाहन दिसत नसल्याने अनेकदा अपघात झालेले आहे. या ठिकाणावरून अनेकदा पोलीस प्रशासनाचे वाहन फिरत असते मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
केल्या जात आहे.

रामपूर टी पॉईंट वरून सास्ती-बल्लारपूर, गोवरी-कवठाळा, राजुरा, गडचांदूरकडे जाणारे मार्ग आहे, यामुळे या पॉईंटवर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरु असते मात्र याच टी पॉईंटवर वेकोलीतून कोळसा वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर दोन्ही बाजूनी उभे करून वाहन चालक आपल्या घरी जात असतात यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून अनेकदा छोटे मोठया अपघाताच्या घटना घडल्या आहे.

या वळण रस्त्यालगत घर असून येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रक चालकांची एवढी मुजोरी वाढली की ते नागरिकांच्या घरासमोर वाहन उभे करून ठेवत आहे. दररोज पोलीस प्रशासनाचे वाहन या ठिकाणी येत असतात मात्र या अवैद्य ट्रक पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाही का करीत नाही असा प्रश्न निर्माण होत असून याकडे पोलीस निरीक्षकांनी लक्ष देऊन अवैद्य पार्किंग वाहनांवर कारवाही करण्याची मागणी नागरिकांनी केलि