देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अरविंदजी केजरीवाल यांच्या राजकीय संस्कृतीपासून प्रेरणा घेवून आम आदमी पार्टी, चंद्रपूर तर्फे आज (दि.१९) ला दुपारी १२ वाजता चंद्रपुर महानगरपालिका समोर ‘पुंगी बजाव आंदोलन’ करण्यात आले.

 आदमी पार्टी चे महानगरपालिका समोर ‘पुंगी बजाव आंदोलन’ करण्यात आले

देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अरविंदजी केजरीवाल यांच्या राजकीय संस्कृतीपासून प्रेरणा घेवून आम आदमी पार्टी, चंद्रपूर तर्फे आज (दि.१९) ला दुपारी १२ वाजता चंद्रपुर महानगरपालिका समोर 'पुंगी बजाव आंदोलन' करण्यात आले.
आदमी पार्टी,चे महानगरपालिका समोर ‘पुंगी बजाव आंदोलन’ करण्यात आले.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob…. 9834024024

चंद्रपूर : – महानगरपालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करीत चंद्रपूरच्या विकासाकरीता सामान्य नागरीकांनी करस्वरुपात दिलेल्या पैशांची उधळपट्टी व अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्याविरोधात आवाज उठविण्यात आला. त्यानंतर आताच आम आदमी पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून अनेकांनी पक्षप्रवेश घेतला. जिल्हा संघटनमंञी पदी श्री.राजेशजी बेले चंद्रपुर विधानसभा प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष पदी हिमायु अली जिल्हा युवा अध्यक्ष पदी श्री.मयुर राईकवार जिल्हा कामगार आघाडी प्रमुख म्हणुन श्री. आशिष झाडे तसेच जिल्हा शेतकरी आघाडी प्रमुख म्हणुन श्री .अरविंद वांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या जिल्ह्यातील विविध पदांच्या जवाबदा-या नविन नियुक्त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या.

येत्या काळात चंद्रपूर महानगरपालिका
तसेच जिल्ह्यातील चंद्रपुर, बल्लारशहा,घुग्गुस, राजूरा, चिमूर येथील नगरपालिका निवडणुका होवू घातल्या आहेत. या निवडणुकीतील आम आदमी पार्टीच्या प्रचाराचा बिगुल वाजवित ‘जनसंपर्क व प्रचार अभियान’ कार्यक्रमाची आज (दि.१९) पासून सुरुवात करीत आहोत. चंद्रपुर, , बल्लारशहा,घुग्गुस, राजूरा, चिमूर येथील नगरपालिका निवडणुकांमधे आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडणुक रींगणात असतील. या निवडणुकांमधे पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे, करीता आमचे प्रयत्न राहतील. जनतेनी राजकारणात तीसरी शक्ती म्हणून आम आदमी पक्षाकडे बघावे. कांग्रेस व बीजेपी, शिवसेना या परंपरागत पक्षांकडून जनतेच्या अपेक्षा आजतागायत पुर्ण होवू शकल्या नाहीत. जिल्ह्यातील एकही शहर संपुर्ण विकासमय झाल्याचे पहायला मिळत नाही. रस्ते, नाल्या, पाणी, आरोग्यसुविधा या बेसिक सुविधांची वाणवा आजही शहरांमधे दिसून येत आहे. जिल्ह्यात मोठमोठे राजकारणी आहेत, मात्र जिल्ह्याच्या विकासापेक्षा स्वत:च्या विकासाकडेच या नेत्यांचे लक्ष अधिक आहे. या जिल्ह्यात रोजगार, प्रदूषण, शिक्षण, आरोग्य सुविधा, सिंचन, शेतकरी व वन्यजिव प्रश्न, उद्योग व स्थानिक प्रश्न, गौन खनिज चोरी, आदी अनेक प्रश्न कित्येक वर्षांपासून जैसे थे आहेत. जिल्ह्याचे राजकारण केवळ दारुभोवती फिरतांना दिसते. कमिशनखोरी, ठेकेदारी, टक्केवारी, वसुली या अर्थकारणाच्या चक्रव्युहात छोटे-मोठे राजकारणी गुंतले आहेत. शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या सुविधा जाव्या, जिल्ह्यातील नागरीकांना हक्काचे लाभ मिळावे. विज, आरोग्य सुविधा, कमी दरात मिळाव्या. याकरीता एकही पक्ष लढतांना दिसत नाही. त्यामुळे प्रस्थापितांना धडा शिकविण्यासाठी या निवडणूकीच्या रींगणात आम आदमी पक्ष असेल, मतदारांनी या जिल्ह्यात नविन पर्याय म्हणुन आम आदमी पक्षाला प्रथम पसंती दर्शवावी. आम आदमी पक्षाची कार्यपध्दती व ध्येयधोरणे जनतेनी दिल्ली येथे आदरनीय अरविंदजी केजरीवाल यांच्या कार्यातून बघीतली व ऐकली आहे. याच प्रमाणे स्वच्छ, प्रामाणिक व भ्रष्टाचारमुक्त राजकारण आम आदमी पार्टी या जिल्ह्यात देखील करेल, यासाठी जनतेनी आम आदमी पार्टी मध्ये सामील व्हावे व आशीर्वाद दयावा, असे या ‘जनसंपर्क व प्रचार अभियान’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे.