संजीवन पवार यांची ‘सरचिटणीस’ पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार.

✒ गुणवंत कांबळे ✒
प्रतिनिधी मुंबई
📲९८६९८६०५३०📲
परेळ:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पहिली मान्यताप्राप्त युनियन, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ या युनियनचे जेष्ठ चिटणीस श्री.संजीवन पवार साहेब यांची आदरणीय अध्यक्ष ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी ‘सरचिटणीस’ पदी निवड केल्याबद्दल मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे नवनिर्वाचित सरचिटणीस माननीय श्री. संजीवन पवार साहेब यांचा जाहिर सन्मानित सत्कार सी विभाग कमिटीच्यावतीने करण्यात आला.
सदर सत्कार कार्यक्रम सहभागी झालेले कमिटीचे कार्यकर्ते श्री.मा.चंद्रकांत मोहिते साहेब उपाध्यक्ष, श्री.दिपकजी जाधव साहेब विभागीय चिटणीस, कोअर कमिटीचे श्री.गणेश कोंडकर सचिव सी विभाग, श्री.सुनिल मांजरेकर निरीक्षक सी विभाग, श्री.संतोष दाभोळकर निरीक्षक सी विभाग, श्री. युवराज जाधव माजी उपाध्यक्ष सी विभाग, श्री.संतोष जाधव अध्यक्ष सी विभाग, श्री. विनोद जाधव सरचिटणीस सी विभाग, श्री.सुरेंद्र कांबळे चिटणीस सी विभाग, श्री.प्रकाशजी कोटकर संपर्कप्रमुख , श्री.निलेश कांबळे प्रसिद्धी प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.