Home latest News महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती बघता मदत करावे, वंचितच्या रेखा ठाकूर यांच कार्यकर्त्यांना...

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती बघता मदत करावे, वंचितच्या रेखा ठाकूर यांच कार्यकर्त्यांना आवाहन.

68

✒️संजय कांबळे✒️
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
मुंबई,दि.24 जुलै:- महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती मुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून हजारो संसार पाण्याखाली बुडाले आहेत. राज्यसरकार ही सगळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेलं असून केवळ सरकारी मदातकार्यावर विसंबून चालणार नाही. त्यामुळे राज्यातील ज्या भागात पूरपरिस्थिती मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तिथे तातडीने यथाशक्ती मदतकार्य पोहचवण्याचे आवाहन कार्यकर्ते, पदाधिकारी यांना करण्यात येत आहे.

गेल्यावेळी आलेल्या पुरात नुकसान झालेल्या गावांना आपण मदत पोहचवली होती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे सरकार पोहचू शकले नाही तिथे वंचितच्या कार्यकर्त्यांनी मदत पोहचवली होती. या आपत्तीच्या वेळीही आपण सर्वांनी आपत्तीग्रस्तांना सावरण्याची पुढे येण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाच्या आणि पुरामुळे निर्माण होणाऱ्या रोगराईच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन आपण सर्वांनी मदतकार्य करावी असे आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशध्यक्षा रेखा ठाकुर यानी केले आहे.