लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात* *विदर्भ -कोकणातील ४ विभागीय* *पदाधिकारी नियुक्त*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात* *विदर्भ -कोकणातील ४ विभागीय* *पदाधिकारी नियुक्त*

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात* *विदर्भ -कोकणातील ४ विभागीय* *पदाधिकारी नियुक्त*
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात* *विदर्भ -कोकणातील ४ विभागीय* *पदाधिकारी नियुक्त*

प्रा.अक्षय पेटकर
ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी वर्धा
9604047240

वर्धा (अकोला ) ः –  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अखिल भारतीय संघटनेमध्ये विभागीय स्तरावर 4 नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
मा.श्री आशाद शेख यांची संघटन तथा संपर्क प्रमुख कोकण विभाग, मा. श्री.सिध्देश्वरजी देशमुख, मा.श्री.कीशोरजी मुटे तर मा.डॉ.श्री.शंकरराव सांगळे या तिन्ही मान्यवरांची संघटन तथा संपर्क प्रमुख विदर्भ विभाग या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यातील श्री.आशाद शेख हे पालघर येथे जगत भारतीचे संपादक असून न्युज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. ते इंडीयन लँग्वेज न्युजपेपर्स या देशातील विविध वृत्तपत्रांच्या संपादक, प्रकाशकांच्या दिल्लीच्या ईलना या संघटनेचे सुध्दा केंन्द्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत.
अकोला येथील श्री.सिध्देश्वर देशमुख हे सिध्देश्वर एक्सप्रेसचे संपादक व एका कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी नेते राहिलेले आहेत. तसेच वर्धा येथील श्री.किशोर मुटे हे पत्रकार, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचे साधक असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय आहेत. तर कापशी, जि.अकोला येथील डॉ.श्री. शंकरराव सांगळे हे साप्ताहिक, मासिकाचे संपादक, भारतमाता मंदिराचे संस्थापक व निकोप समाज निर्मितीच्या विचार परिवर्तन चळवळीतील आक्रमक नेते आहेत.
आगामी काळात देशातील इतर राज्यांमध्ये संघटनेला मजबुत करण्याचे प्रयत्न सुरू होणार आहेत. तत्पुर्वी महाराष्ट्रातील संघटनकार्यात चैतन्य निर्माण करून संघटनेला सशक्त करण्यासाठी अनेक महत्वाच्या नियुक्त्या करण्याचे काम संघटनेने सुरू केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्हाध्यक्षपदावर पत्रकार श्री. विवेक मेतकर यांच्या नियुक्तीनंतर ह्या प्रादेशिक नियुक्त्या संस्थापक-अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात पत्रकार आणि सामाजिक प्रश्नांकरीता लढा देण्यास सिद्ध झालेल्या या संघटनेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सभासदत्व स्विकारुन सहभागी व्हावे. सामाजिक नेत्यांनीही आपल्या संपर्कातील पत्रकारांना याकरीता प्रोत्साहीत करावे, असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी केले आहे.