मिडीया वार्ता न्यूज

मुंबई :  महाराष्टत गुटखा विक्री बंदी असताना देखील राजरोसपणे काही असामाजिक लोकांच्या धाक दपटशाहीवर गुटखा विक्री केली जात आहे. हे जेव्हा मिडिया वार्ता न्यूजच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी पत्राद्वारे नंतर माहितीचा अधिकार २००५ च्या अंतर्गत व नंतर अपील द्वारे अन्न व औषध प्रशासन वि•ााग ह्यांना धडक कारवाई करण्यास •ााग पाडले आणि लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये मो. इलियास अहमद, सुपारीवाला,

शॉप नं. १४ डोंगरी म्युनिसिपल मार्केट डोंगरी, मुंबई: ९ येथे धाड टाकून २ लाख ४ हजार ९८० रु. चा मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये राज कोल्हापुरी गुटखा, राजश्री पानमसाला, विमल पान मसाला, रंजनीगंधा प्लेव्हर्ड पानमसाला, •ोला टोबॅको, सेटेड टोबॅको असा माल पकडला असून दुसरे मे. शमीम अहमद अ‍ॅण्ड कंपनी बंगालीपुरा मुंबई: ९ यांच्या कारवाई करताना रंजीगंधा पानमसाला, पानविलास पानमसाला,

विमल पानमसाला, शिखर गुटखा, राजश्री पानमसाला, मिराज स्वदेशी टोबॅको एकूण रुपये ५ लाख २५ हजार ७७२ रुपयांचा माल हस्तगत केला. तसेच श्री अबुसालीम शमीम अहमद खान मुर्गी मोहल्ला, मुंबई: ९ सागर २००० गुटखा रितिक स्विट, सुपारी विमल पानमसाला पानपराग पानमसाला, ९२८२५ अशी धडक कारर्वाु मिडिया वार्ता न्यूजने केली आहे. त्याच्या या मोहिमेबद्दल एफडीए ने त्यांचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here