पूर्वसूचना न देता नाव कामगारांना काढले कंपनीतून.* *कामगारांचे वेतन तसेच व्हिआर एस फंड ताबडतोब द्यावे : कामगार नेते किशोर बागडे*

*पूर्वसूचना न देता नाव कामगारांना काढले कंपनीतून.*

*कामगारांचे वेतन तसेच व्हिआर एस फंड ताबडतोब द्यावे :
कामगार नेते किशोर बागडे*

पूर्वसूचना न देता नाव कामगारांना काढले कंपनीतून.* *कामगारांचे वेतन तसेच व्हिआर एस फंड ताबडतोब द्यावे : कामगार नेते किशोर बागडे*
पूर्वसूचना न देता नाव कामगारांना काढले कंपनीतून.*
*कामगारांचे वेतन तसेच व्हिआर एस फंड ताबडतोब द्यावे :
कामगार नेते किशोर बागडे*

युवराज मेश्राम

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कळमेश्वर : -कळमेश्वर औद्योगिक क्षेत्रातील नामांकित असलेली युनिज्यूल्स लाइफ सायन्स लिमिटेड कंपनीतून कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता दिनांक 31जुलै 2021 ला कामावरून काढण्यात आले यामुळे एकच खळबळ कामगारांमध्ये उडाली प्राप्त माहितीनुसार युनीज्यूलस लाइफ सायन्स लिमिटेड कंपनी ते कामगार गेल्या नऊ ते बारा वर्षापासून काम करत होते व तसेच स्थाईक कामगार होते परंतु त्यांना एकाएकी कंपनी प्रशासनाने कामावरून काढले याबाबत त्यांनी प्रशासनाला विचारले असता त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही नियमानुसार त्यांना पूर्वसूचना देऊन त्यांना तीन महिन्याचा पगार त्यांचे जॉइनिंग झाली तेव्हापासून आजपर्यंत चा हिशोब करावा तसेच त्यांचे पीएफचे पैसे असे सर्व औद्योगिक नियमानुसार वेतन द्यावे परंतु कंपनीने या कामगाराचे 26 महिन्याचे पीएफ पूर्णपणे भरला नसल्याचे या कामगारांनी सांगितले

कंपनी प्रशासन स्थानिक कामगारांना पूर्वसूचना न देता काढू शकत नाही त्यांनी औद्योगिक नियमानुसार या कामगारांना व्हिआर एस फड तीन महिन्याचे वेतन तसेच पीएफचे पैसे द्यावे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा व इतर विषयी विचार करावा एकीकडे कोरोणा काळात कंपनी कामगारांना दिलासा देण्याऐवजी कामगारांना काढून राहिली आहे हे अन्यायकारक आहे या कामगारांचे कंपनीने पूर्ण पैसे त्वरित द्यावे अन्यथा आम्ही त्यांच्यासाठी संघर्ष करत आंदोलन करू
किशोर बागडे कामगार नेते कळमेश्वर

मी बाहेर कार्यक्रमात व्यस्त असल्याने माहिती उद्या देईल
महेंद्र सोनवणे व्यवस्थापक
युनिज्यूल्स लाइफ सायन्स लिमिटेड कळमेश्वर