*लोहारा गावातील विकासाची वाटचाल ग्रामपंचायतने पोळा चौकातील काढले अतिक्रमण*

बाळापूर तालुका जिल्हा अकोला
प्रविण मोरे
बाळापुर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील वर्षानुवर्ष असलेली शासकीय जागा पोळा चौकातील नागरिकांनी सदर शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केले होते. या चौकामध्ये मागील कित्येक वर्षांपासून या जागेवरती बैलाचा पोळा भरत होता परंतु येथे अतिक्रमण असल्यामुळे पोळा भरण्यासाठी कमी पडत होती. सदर अतिक्रमण नवनिर्वाचित संरपच प्रविण प्रल्हाद मोरे यांनी अतिक्रमण काढल्यामुळे मोठे मैदान झाले त्यामुळे आता बैलाचा पोळा भरण्यास जागा कमी पडणार नाही. अतिक्रमण काढतांना उपस्थित म्हणून लोहारा येथील सरपंच प्रविण मोरे, उपसरपंच असलम देशमुख इसाक ठेकेदार गणेश वावरे दाबेराव संजय बकाल एकनाथ वावरे उत्तम वाघ गोविंद मोरे गोपाल प्रजापती उत्तम इंदोरे , दिपक कुऱ्हाडे ,अंकुश डंबलकार,व गावातील नागरिक उपस्थित होते.








