लाखाचे डिझेल चोरट्यास सहा तासात अटक

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
देवळी : -तक्रार दाखल झाल्याच्या सहा तासात डिझेल चोरांना मुद्देमालासहित अटक करण्याची भरीव कामगिरी देवळी पोलिसांनी केली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार चिंतामणी नगर देवळी येथील डॉ. वैभव पांडुरंग कापसे यांच्या मालकीचा देवळीपासून 20 किमी अंतरावर असलेल्या शिरपूर (होरे) येथे पेट्रोल पंप आहे. बुधवारी 11 च्या मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान अज्ञात चोरांनी डिझेल टॅंकचे झाकन फोडून 1 लक्ष 3 हजार 950 रुपये किंमतीचे 1हजार 50 लिटर डिझेल चोरून नेले. गुरुवारी घटना उघडकीस आल्यावर कापसे यांनी देवळी पोलीस स्टेशनमध्ये डिझेल चोरीची तक्रार नोंदविली.
घटनेचा छडा लावत देवळी पोलिसांनी रविन्द्र मारोती शिवरकर 32, आकाश नरेश नागपुरे 22, गणेश दिलीप शिवरकर 19 सर्व रा. खर्डा यांना अटक केली. त्यांच्या कडून 40 हजार 590 रुपये किंमतीचे 410 लिटर डिझेल,9 लक्ष रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनीची मालवाहू चारचाकी,आणि 1लक्ष रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल असे एकूण 10 लक्ष 40 हजार 590 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तुळजापूर चौपदरी महामार्गावर शिरपूर येथे जड वाहनांना कमी किंमतीमध्ये डिझेल विक्रीचा व्यवहार अनेक दिवसांपासून सुरु होता.आता आरोपीनां अटक झाल्यामुळे डिझेल चोरीला लगाम बसण्याची शक्यता आहे.सदरहू कारवाई पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात अनिल तिवारी, मनोज नांदूरकर, योगेश वानखेडे, रवी नवथळकर, कुणाल हिवसे, उमेश गेडाम, दयाल धवने, मिथुन राठोड यांनी पार पाडली.








