सातारा, स्वता:च्या पत्नीची आणि प्रेयसीची हत्या करुन दोघीला पण शेतात पुरलं.

✒️MVN क्राईम रिपोर्टर✒️
सातारा:- सातारा जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र हादळला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात व्याजवाडी गावात राहणाऱ्या नितीन गोळे या नराधमाने 2019 मध्ये एक आणि आता 3 ऑगस्टला एक असे दोन हत्या केल्याचं समोर आल्याने सर्वीकडे एकच खळबळ उडाली आहे.
वाई तालुक्यातील व्याजवाडी परिसरात नितीन गोळे या नराधम आरोपीने आपल्याच स्वता:च्या पत्नी आणि प्रेमीकेची अशा दोघींचाही हत्या केला आहे. आरोपी नितीन गोळेने 3 ऑगस्टला प्रेमिका संध्या शिंदे हिची हत्या करुन तिचा मृतदेह शेतात लपावला होता. पण भुईंज पोलिसांनी केलेल्या तपासात नराधम गोळेचं बिंग फुटलं.
विशेष म्हणजे आरोपी नितीन गोळे याने 2019 मध्ये पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरला होता 3 ऑगस्ट ला प्रेमीका संध्या शिंदे हिची हत्या करून नितीन गोळे यानं तिचा मुतदेह शेतात लपावला.
या खूनाचा भुईंज पोलिसांनी छडा लावल्या नंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. 2019 मध्ये नितीन गोळेने पत्नी मनीषा गोळे हीचा देखील खून करून मृतदेह शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला असल्याचं समोर आलं.
धक्कादायक बाब म्हणजे पत्नीची हत्या करते वेळी त्याची दोन लहान मुले तिथेच होती. आपल्या लहान मुलांच्या समोरच या नराधमाने पत्नीची हत्या केल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.
नितीनने पत्नी मनीषा गोळेचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता, त्या ठिकाणी जाऊन खोदकाम करत पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला. नितीन गोळे साताऱ्यातील वाई तालुक्यातील व्याजवाडी गावात राहणारा आहे. नितीन आर्मी मध्ये भरती झाला होता. पण अवघ्या दोन महिन्यातच तो तिथून पळून आला आणि सध्या शेती करत होता. सध्या तरी दोन हत्येची कबुली या नराधम आरोपीने दिली अजून काही खून केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.