Home latest News वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण संपन्न.

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण संपन्न.

73

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण संपन्न.

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण संपन्न.
वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण संपन्न.

✒️संजय कांबळे ✒️
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली,दि.14 ऑगस्ट:- मिरज तहसीलदार कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील कामचुकार, बेशिस्त, निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यां वर दफ्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करून तशी नोंद त्यांच्या सेवा पुस्तकावर व्हावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शनिवार दि.14 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला सुरु करण्यात आले. मिरज तहसीलदार कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात ३-३ वर्ष झाले गोरगरीब, कष्टकरी, श्रमिक जनतेचे रेशन धान्य मिळण्याबाबत अर्ज अडखळले आहेत त्यावर त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. अश्या परिस्थितीत गोरगरीब,कष्टकरी, श्रमिक जनतेने काय करावे? गोरगरिबांनी जगायचे कसे? हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. आणि विचारणा केली असता अधिकारी आणि कर्मचारी ह्यांच्या कडून बेशिस्त वर्तवणुक अभद्र व्यवहार, अशोभनीय भाषा करून गोरगरीब नागरिकांना भीती घालण्यात येते असाच प्रकार श्री तोडकर ह्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी सोबत करण्यात आले.

सांगली जिल्हा अन्न धान्य पुरवठा अधिकारी यांनी, यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना मिरज तहसीलदार कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील कारवाई तसेच संबंधित जबाबदार अधिकारी यांच्या खाते निहाय चौकशी सुरू असल्याची लेखी प्रत देण्यात आली,तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या विनंतीला मान देऊन तात्पुरता आमरण उपोषण स्थगित करण्यात आले व कारवाई न झाल्यास पुन्हा येत्याल्या ८ दिवसांनी दिनांक २३ ऑगस्ट २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सर्व पिढीत कष्टकरी श्रमिक नागरिकांना घेऊन आमरण उपोषण सुरू करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमर फारूक ककमरी, जिल्हा संघटक संजय कांबळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, परशुराम कांबळे, सचिन कोलप, हिरामण भगत, आंनदा गाडे, सिद्धार्थ कोलप, मानतेश कांबळे, संतोष कदम, चंद्रकांत कांबळे, सर्जेराव सावंत यांच्या बरोबरच श्रमिक कष्टकरी पिढीत नागरिक उपस्थित होते.