पत्नीच्या चारित्र्यावर घेत होता संशय* *दोघांमध्ये रोज रोज सारखा वाद* *अखेर पत्नीचा थेट कुऱ्हाडीने हल्ला पतीचा जागीच मृत्यू* *या घटनेने संपुर्ण नागपूर हादरलं*

*पत्नीच्या चारित्र्यावर घेत होता संशय*

*दोघांमध्ये रोज रोज सारखा वाद*

*अखेर पत्नीचा थेट कुऱ्हाडीने हल्ला पतीचा जागीच मृत्यू*

*या घटनेने संपुर्ण नागपूर हादरलं*

पत्नीच्या चारित्र्यावर घेत होता संशय* *दोघांमध्ये रोज रोज सारखा वाद* *अखेर पत्नीचा थेट कुऱ्हाडीने हल्ला पतीचा जागीच मृत्यू* *या घटनेने संपुर्ण नागपूर हादरलं*
पत्नीच्या चारित्र्यावर घेत होता संशय*
*दोघांमध्ये रोज रोज सारखा वाद*
*अखेर पत्नीचा थेट कुऱ्हाडीने हल्ला पतीचा जागीच मृत्यू*
*या घटनेने संपुर्ण नागपूर हादरलं*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नागपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत वाद सुरु असताना संतापात पतीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नागपूर : पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नागपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत वाद सुरु असताना संतापात पतीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला आहे. चारित्र्याच्या संश्यावरुन पती-पत्नीमध्ये सारखा वाद व्हायचा. त्यातूनच पतीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा (खुर्द) येथे घडली आहे. सुकलसिंग माखनसिंग सकोम असं मृतक पतीचं नाव आहे. मृतक सुकलसिंग आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व्हायचा. यावेळी देखील दोघांमध्ये याच विषयावरुन वाद झाला.
पत्नीचा थेट कुऱ्हाडीने हल्ला
पती चारित्र्यावरुन संशय घेत असल्याने महिलेला प्रचंड राग आला होता. याशिवाय या विषयावरुन दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. त्यामुळे यावेळी तिने संतापात आपल्या पतीवर थेट कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी पतीच्या मानेला कुऱ्हाड लागली. त्यातच पतीचा मृत्यू झाला.
आरोपी महिलेला अटक
संबंधित घटनेची माहिती मिळताच काटोल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी आरोपी पत्नीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.