आमदार सुभाष धोटे यांनी केले वीज पडून मृत्यू पावलेल्या पिडीत कुटुंबियांचे सांत्वन* *वेळगाव येथील रेखा घुबडे आणि मारोती चौधरी यांचा वीज पडून दुदैवी मृत्यू*

*आमदार सुभाष धोटे यांनी केले वीज पडून मृत्यू पावलेल्या पिडीत कुटुंबियांचे सांत्वन*

*वेळगाव येथील रेखा घुबडे आणि मारोती चौधरी यांचा वीज पडून दुदैवी मृत्यू*

आमदार सुभाष धोटे यांनी केले वीज पडून मृत्यू पावलेल्या पिडीत कुटुंबियांचे सांत्वन* *वेळगाव येथील रेखा घुबडे आणि मारोती चौधरी यांचा वीज पडून दुदैवी मृत्यू*
आमदार सुभाष धोटे यांनी केले वीज पडून मृत्यू पावलेल्या पिडीत कुटुंबियांचे सांत्वन*
*वेळगाव येथील रेखा घुबडे आणि मारोती चौधरी यांचा वीज पडून दुदैवी मृत्यू*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

हि बातमी मिडिया वार्ता न्युज ने सर्वात पहिले लावली .. त्याच बातमीची दखल घेऊन आमदार सुभाष धोटे यांची वेळगाव येथील विज पडून मृत्यु पावलेल्या कूंटूबीयाला भेट

गोंडपिपरी :– शेतात डवरनी करीत असतांना वीज कोसळल्याने दोघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे दुपारचा सूमारास घडली. रेखा अरूण घुबडे, मारोती बाबुराव चौधरी अशी मृतकांची नावे आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष धोटे यांनी या दोन्ही मृतांच्या पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दोन्ही कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून वैयक्तिक रीत्या प्रत्येकी ५ हजार रुपये रोख रक्कम दिली. आणि वीज पडून मृत्यू झाल्याने शासनाकडून मिळणारी सर्व प्रकारची मदत तातडीने मिळवून देण्याची हमी दिली. दोन्ही पिडीत कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथिल रेखा अरूण घूबडे यांनी सहा एकर शेती ठेक्याने घेतली. गावापासून जवळच असलेल्या शेतात कापूस पिक उभे आहे. शेतात डवरण करण्यासाठी रेखा घुबडे यांनी गावातील मारोती चौधरी याला बोलाविले. सोबतच दोन मजूर शेतात काम करीत होते. अंदाजे तीन वाजताचा पावसाचे वातावरण झाले. याच दरम्यान शेतात विज कोसळली. या घटनेत रेखा घुबडे, मारोती चौधरी यांचा दुदैवी मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच आमदार सुभाष धोटे यांनी या दोन्ही मृ तकांच्या पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि मदत कार्य तातडीने करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले.