मिडिया वार्ता न्युजचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी आशिष अंबादेचा वाढदिवस साजरा.

✒प्रशांत जगताप✒
कार्यकारी संपादक
9766445348
वर्धा/ हिंगणघाट:- मिडीया वार्ता न्युजचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ता मा. आशिष अंबादे साहेबांचा वाढदिवस स्थानिक हिंगणघाट येथील डॉ. रुबा चौक मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मिडिया वार्ता न्यूज आणि आशिष अंबादे मित्र परीवार यांच्या द्वारा आयोजित करण्यात आलेल्या आशिष अंबादे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजू बाजूच्या गरीब आणि गरजू परीसराती लोकांना केक, मिठाई वाटण्यात आली.
आशिष अंबादे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
यावेळी मिडिया वार्ता न्यूजचे उपसंपादक मुकेश चौधरी, मिडिया वार्ता न्यूजचे कार्यकारी संपादक कोरोना योद्धा संजय दुबे, सुरज हजारे, गोपाल दुबे, प्रवीण नगरकर, उमेश धोटे, सुयोग वासेकर यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा झाला. आशिष अंबादे यांच्या वाढदिवसानिमित्त मिडिया वार्ता न्यूजचे मुख्य संपादक भागुराम सावंत साहेब, मिडिया वार्ता न्यूजचे मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ मनोज खोब्रागडे आणि इतर सामाजिक कार्यकर्ते, नेते, पत्रकार आदींनी प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.