गोंडपिपरी शिवसेने केला केंद्रीय मंत्री राणेचा निषेध ; निवेदनातून अटक करण्याची मागणी*

*गोंडपिपरी शिवसेने केला केंद्रीय मंत्री राणेचा निषेध ; निवेदनातून अटक करण्याची मागणी*

गोंडपिपरी शिवसेने केला केंद्रीय मंत्री राणेचा निषेध ; निवेदनातून अटक करण्याची मागणी*
गोंडपिपरी शिवसेने केला केंद्रीय मंत्री राणेचा निषेध ; निवेदनातून अटक करण्याची मागणी*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी : -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाबद्दल अपशब्द बोलले.यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचा भावना दुखावल्या.केंद्रीय मंत्री राणे यांचा जाहीर निषेध गोंडपिपरीत करण्यात आला.ठाणेदारामार्फत गृहमंत्रांना पाठविलेल्या निवेदनातून राणे यांना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाबत अपशब्द वापरले.यामुळे शिवसैनिकांचा भावना दुखावल्या.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ना.राणे यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे,जिल्हा उपप्रमुख संदीप करपे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी येथे शिवसैनिकांनी ना.राणे विरोधात रोष व्यक्त केला.ना.राणे यांच्या जाहीर निषेध करीत,अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.तश्या आशयाचे निवेदनात गोंडपिपरीचे ठाणेदार संदिप धोबे यांच्या मार्फत गृहमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सूरज माडूरवार,शैलेश बैस,तालुका संघटक,अशपाक कुरेशी,विवेक राणा,तुकाराम सातपुते,बळवंत भोयर उपस्थित होते.