46 कोटींच्या साखर घोटाळा प्रकरणी, परळीतून वैद्यनाथ बँकेचा अधिकारी पोलिसांनी पकडला उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड :- कळंब तालुक्यातील हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याच्या कथित 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्यात 2 सप्टेंबर रोजी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी येथून वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना ताब्यात घेतले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील बँक अधिकाऱ्याच्या अटकेने राजकीय व सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार प्रीतम मुंडे या बँकेच्या संचालक आहेत.

हावरगाव ता.कळंब येथील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी येथील वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळाप्रकरणी 12 मार्च 2021 रोजी कळंब ठाण्यात शंभू महादेव कारखान्याचा चेअरमन दिलीप आपेटसह 40 जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा तपास उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. या प्रकरणात आतापर्यंत केवळ दोघांना पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. 2 सप्टेंबर रोजी परळी येथून वैद्यनाथ बँकेचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना पोलिसांनी परळी येथून ताब्यात घेतले.

असे आहे प्रकरण ?
हावरगाच्या शंभू महादेव साखर कारखान्याने 2002 ते 2017 या कालावधीत 47 कोटी 23 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. 154177 एवढे साखरेचे पोते (तारण साखर साठा) असल्याचे भासवून दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणून साखर साठा ठेवल्याचे दाखवले. तारण असलेल्या साखरेचे गोदाम दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. या बँकेने सील केले होते. यात अफरातफर झाली असल्याचे उघडकीस आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here