हिंगणघाट शहरातील कोरोनाचा काळातील सन 2020 ते 21 चा घर टॅक्स मध्ये 50% सवलत द्या.
हिंगणघाट शहरातील कोरोनाचा काळातील सन 2020 ते 21 चा घर टॅक्स मध्ये 50% सवलत द्या.

हिंगणघाट शहरातील कोरोनाचा काळातील सन 2020 ते 21 चा घर टॅक्स मध्ये 50% सवलत द्या.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेची पालिका मुख्याधिकारी कडे निवेदनाद्वारे मागणी.

हिंगणघाट शहरातील कोरोनाचा काळातील सन 2020 ते 21 चा घर टॅक्स मध्ये 50% सवलत द्या.
हिंगणघाट शहरातील कोरोनाचा काळातील सन 2020 ते 21 चा घर टॅक्स मध्ये 50% सवलत द्या.

✒मुकेश चौधरी✒
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
7507130263
हिंगणघाट :- कोरोना वायरस महामारीने महाराष्ट्रात सर्व गावातील नागरिकाना झळ सहन करावी लागली आणि आता पण सहन करावी लागत आहे. हिंगणघाट शहरातील कोरोना वायरस महामारीच्या काळातील घर टॅक्स कर 50% टक्के माफ करा यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेने तर्फे हिंगणघाट नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देत मागणी करण्यात आली.

महाराष्ट्रातसह हिंगणघाट शहरात कोरोना वायरस महामारीच्या काळात राज्य शासनाने लावलेल्या निर्बंधाने सामान्य नागरिनाने आणि छोट्या मोठ्या व्यवसायिकांने काठेकोरपणे पालन केले परंतु यात सामान्य नागरिकांचे आणि छोट्या -मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या काळात सामान्य नागरिकांचा हाताला काम सुद्धा नव्हते त्यात नगर पालिका प्रशासनाने ठरवलेल्या वेळातच दुकाने सुरू करणे व बंद करणे त्यामुळे दुकानदार व ग्राहकांमध्ये योग्य तेवढा वेळ देता येत नसल्याने त्यांचा व्यवसायावर परिणाम दिसून आला अशा बिकट परिस्थितीत नगर पालिका प्रशासनाने घर टॅक्स कर कमी करावा तसेच शहरात प्रत्येक वॉर्डातील घरा -घरापर्यंत पोहोचनारी घंटा गाडी दररोज प्रभागात दिसाला हवी त्याचप्रमाणे घंटा गाडी च्या टॅक्समध्ये 5% वाढ करण्यात आली ती वाढ पूर्णपणे कमी करावी.

याच बरोबर एक वर्षा पासून शाळा बंद असून टॅक्स मध्ये शिक्षण कर आकारत आहे या शिक्षण कराचा सामान्य जनतेला उपोयोग काय? त्यामुळे हा शिक्षणकर सुध्दा कमी करण्यात यावा. सामान्य माणूस आधीच कोरोना मुळे भरकटला गेला आहे त्यात इतका मोठा प्रमाणात विविध कर लागलेला टॅक्स सामान्य माणूस भरू शकणार नाही त्यामुळे यावर्षी सन 2020 ते 2021 चा घर टॅक्स नगर पालिका प्रशासनाने 50 टक्के सवलत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. यामुळे सामान्य जनते ला दिलासा मिळेल.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष मारोती महाकालकर, मनसे शहर अध्यक्ष राजू सिन्हा, बचु कलोडे, प्रल्हादजी तुळारे, उमेश नेवारे,रवि सोनकुसरे, परम बावणे, दिपक चांगल, प्रशांत ऐकोणकर, विशाल माथनकर, अमोल मुडे, राजू मुडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here