गोंडपीपरी तालुक्यातील प्रशांत भंडारे झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित

48

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:तालुक्यातील फुलोरा हेटी येथे कार्यरत असलेले उपक्रम शील शिक्षक प्रशांत भंडारे यांना यावर्षीचा झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार प्राचार्य रत्नमाला भोयर नगराध्यक्ष मूल ..ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते आणी ईत्तर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले.

मुळातच काव्यलेखन, चित्रकलेची आवड असणारे शिक्षक असुन आतापर्यंतच्या त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नाथ पंथीय 30 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून शालेय साहित्याचे मोफत वितरण केले आहे. दरवर्षी रक्तदान शिबीरात सहभाग घेतात युनिसेफ व भारत सरकार प्रणीत खेळाद्वारे शिक्षण या उपक्रमात राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्याच बरोबर दरवर्षी वृक्षारोपण व स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग घेऊन शाळा व परिसर सुशोभित केले आहे ..त्यांचा “कवडसा” हा वाक्य संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गझलकार म्हणून नावलौकिक मिळविले आहे. या पुर्वी त्यांना शिव छत्रपती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या शैक्षणिक व साहीत्य सेवेची दखल घेऊन झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर च्या वतीने झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.