हिंगणघाट तालुक्यात अवैध लेआऊटमध्ये “भुखंड झाला श्रीखंड”.

45

हिंगणघाट तालुक्यात अवैध लेआऊटमध्ये “भुखंड झाला श्रीखंड”.

हिंगणघाट तालुक्यात अवैध लेआऊटमध्ये "भुखंड झाला श्रीखंड".
हिंगणघाट तालुक्यात अवैध लेआऊटमध्ये “भुखंड झाला श्रीखंड”.

✒ मुकेश चौधरी ✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात टाऊन आणि कंट्री प्लॅनिंगकडून लेआउट मंजुरीच्या प्रतीच्या आधारावर जमिनीची नोंदणी न करता आज घर बांधण्याचे किंवा गुंतवणुकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना फसवीले जात असल्याचे समोर येत असते.

शासनाकडुन लेआउटची कुठलीही परवागी न घेता जमिनीचे तुकडे करून भूखडाची सर्हासपणे विक्री केली जात आहे. अशा वसाहतींमध्ये ना रस्ते बांधले जातात, ना पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसतात. बेकायदेशीर भूखंड हे बिल्डर विकत असल्याची महिती सूत्राकडुन मिळाली आहे.

हिंगणघाट शहरातील काही भागात परवागी न घेता शेत जमीनी खरेदी करुन अवैध लेआऊट टाकून बेकायदेशीर भूखंड विक्रीचे काम सुरू आहे. त्यात प्रशासनातील कर्मचारी आणि नेत्यांच्या सहभागाचाही समावेश आहे. कदाचित हेच कारण आहे की कारवाईच्या नावाखाली प्रशासन झोपेचे सोंग करते आणि भूमाफियांना भरभराटीची पूर्ण संधी दिली जाते.

जमीन माफिया महसूलचे मोठे नुकसान करत आहे हे भूमाफिया बेकायदेशीर लेआऊट साठी हिरवी झाडे कापून पर्यावरणाचे नुकसान करते तसेच महसुलाचे मोठे नुकसान करते. परंतु असे असूनही त्यांच्यावर कोणीही कारवाई करण्यास तयार नाही.