*बाबुपेठ येथील असंख्य महिलांनी घेतला आप मध्ये प्रवेश*
*बाबुपेठ प्रभागातील सर्व जागा जिंकु– राजु कुडे सचिव महानगर*

*बाबुपेठ प्रभागातील सर्व जागा जिंकु– राजु कुडे सचिव महानगर*
संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045
येणारी महानगरपालिका निवडनुक ताकदीने लढविन्याचा संकल्प आप ने घेतला असुन आज महानगरातील बाबुपेठ प्रभाग येथील छत्रपती चौक येथील श्रीमती स्नेहा ताई कुकडे, अंजू ताई रामटेके, पिंकी गाडगे, मनीषा धाबेकर, संगीता ताई खडसे, श्रीमती शाहिस्ता पठाण,सविता पकमोडे,निशा हनुमंते, खिरेकर ताई, शीतल चौधरी,प्रियांका गुरुनुले, छाया ढगले,शीतल चौधरी,संगीता गजभिये,रंजना गुरूनुले, ज्योती गुरुनुले,ललिता खनके यानी अरविंद केजरीवाल यांच्या शिक्षित राष्ट्र सुरक्षित राष्ट्र, भ्रष्ट्राचार मुक्त भारत, व्यवस्था परिवर्तन, स्वराज या मूलभूत धोरणाशी एकनिष्ठ होऊन आम आदमी पक्षामध्ये प्रवेश घेतला. यावेळी चंद्रपूर शहर चे सचिव तथा बाबुपेठ प्रभारी राजु शंकरराव कुडे यांच्या नेतृत्वात तसेच बाबुपेठ प्रभाग संयोजिका श्रीमती सुजाता बोदेले यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम पार पडला..
सर्व नवनियुक्त सदस्य यांनी यावेळेस महानगर पालिकेत बदल घडवून आम आदमी ची सत्ता आणण्याची घोषणा केली व जनतेस मुलभुत सुविधा पोहोचविण्याचा संकल्प केला. यावेळेस शहर सचिव राजु भाऊ कुडे, आपचे झोन संयोजक सुखदेव दारुंडे, बाबुपेठ प्रभाग संयोजक जयंत थूल, प्रभाग सहसंयोजक निखिल बारसागडे,श्री. जयदेव देवगडे, महेश सिंह पाजी, शैलेश सोनकुसरे, हितेश धोकडे, बाबाराव जी खडसे, चंदु माडूरवार,अश्रफ सय्यद, नितीन शेंडे, तसेच ईतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते..