अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या डॉक्टर उत्तमदादा राठोड गायत्री फाउंडेशनची निवेदनातून मागणी

58

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

डॉक्टर उत्तमदादा राठोड

गायत्री फाउंडेशनची निवेदनातून मागणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या डॉक्टर उत्तमदादा राठोड गायत्री फाउंडेशनची निवेदनातून मागणी
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या
डॉक्टर उत्तमदादा राठोड
गायत्री फाउंडेशनची निवेदनातून मागणी

✍🏻मीडिया वार्ता न्यूज ✍🏻
राम राठोड
9422160416
तालुका प्रतिनिधी दिग्रस

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले खरीप पीकाचे प्रचंड नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गायत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उत्तमदादा राठोड यांनी निवेदन मार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावर्षी सतत चालू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस,उडीद, मूग, बरबटी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे. अनेक तालुक्यातील पिके खरडून गेली आहेत तर अनेक ठिकाणी कापणीस आलेल्या पिके सडली आहे तर सोयाबीन या पिकाला कोंब फुटले आहेत. तर काही शेतातील कापसाचे बोंड सुद्धा सडलेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावा लागत आहे. त्यामुळे कृषी विभागाला तात्काळ अध्यादेशीत करून नुकसान भरपाई करून द्यावी. अशी मागणी गायत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष उत्तम दादा राठोड यांनी केली आहे.