Home latest News रोटरी इंटरनॅशनल इंडिया चे अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार...

रोटरी इंटरनॅशनल इंडिया चे अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार ..!! रोटरी जळगाव रॉयल्स चे सहकार्याने उद्दिष्टपूर्ती साठी पुढाकार

84

रोटरी इंटरनॅशनल इंडिया चे अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार ..!!

रोटरी जळगाव रॉयल्स चे सहकार्याने उद्दिष्टपूर्ती साठी पुढाकार

रोटरी इंटरनॅशनल इंडिया चे अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार ..!!  रोटरी जळगाव रॉयल्स चे सहकार्याने उद्दिष्टपूर्ती साठी पुढाकार
रोटरी इंटरनॅशनल इंडिया चे अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार ..!!
रोटरी जळगाव रॉयल्स चे सहकार्याने उद्दिष्टपूर्ती साठी पुढाकार

 

मिडिया वार्ता न्युज

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

विशाल सुरवाडे

 

जळगाव:- आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी रोटरी क्लब व श्री श्री रविशंकर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने एक देश एक दिवस व एक दशलक्ष लोकांचे ब्लड शुगर टेस्ट करण्याचे नियोजन केलेले होते व या करता रोटरी क्लब ऑफ इंडिया राष्ट्रीय स्तरावर एक दिवसाचे चेक अप करण्याचे नियोजन केले होते आज पर्यंत एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने जगात कोठेही चेकअप कॅम्प झालेले नव्हते व हे केल्यामुळे याची नोंद अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे. याकरता भारतातल्या सर्व रोटरी क्लब व त्यांचे सभासद यांच्या अथक परिश्रमामुळे हे साध्य होणार होते व या करता जळगाव शहरातील रोटरी क्लब व जळगाव रॉयल्स यांनी टॉवर चौकात मंडोरा चेंबर्स इथे 100 लोकांच्या तपासणीचे उद्दिष्ट पूर्ण केले या उपक्रमात प्रामुख्याने जळगाव चे आमदार श्री राजू मामा भोळे व शिवसेना जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री विष्णू भाऊ भंगाळे यांची उपस्थिती राहिली या उपक्रमात रोटरी सेंट्रल चे ही सदस्य श्री महेंद्र गांधी व श्री अजय जैन उपस्थित होते. व डॉक्टर जितेंद्र मंडोरा यांनी सहकार्य केले.

या उपक्रमाचे पूर्तीसाठी रोटरी जळगाव रॉयल्स चे प्रेसिडेंट श्री स्वप्नील जाखेटे सेक्रेटरी सचिन जेठवाणी ,सचिन खडके, दीपक पाटील , व विजय लाठी यांनी विशेष परिश्रम घेऊन हे उद्दिष्ट पूर्ण केले