Home latest News राळेगाव पोलीस स्टेशन येथे ‘युनिसेफ’ महिलांचे कोव्हीड-१९ जनजागृती व मास्क विक्री !

राळेगाव पोलीस स्टेशन येथे ‘युनिसेफ’ महिलांचे कोव्हीड-१९ जनजागृती व मास्क विक्री !

67

राळेगाव पोलीस स्टेशन
येथे ‘युनिसेफ’ महिलांचे कोव्हीड-१९ जनजागृती व मास्क विक्री !

राळेगाव पोलीस स्टेशन येथे 'युनिसेफ' महिलांचे कोव्हीड-१९ जनजागृती व मास्क विक्री !
राळेगाव पोलीस स्टेशन
येथे ‘युनिसेफ’ महिलांचे कोव्हीड-१९ जनजागृती व मास्क विक्री !

*राळेगाव,यवतमाळ साहिल महाजन

नवक्रांती लोकसंचालीत साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक छोटेखानी कार्यक्रम राळेगाव पोलीस स्टेशन येथे घेण्यात आला असून त्या अनुषंगाने राळेगाव शहर पोलीस स्टेशनला नव्यानेच कर्तव्यावर रूजू झालेले ठाणेदार मा.श्री.संजय एस.चौबे सर, मा.युवराज पाईकराव सर, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती उषाताई भोयर,भाजपा तालुका सचिव,अति दक्षता समिती चे सदस्या भा.ना.र.सं.अध्यक्षा सौ.संतोषीताई वर्मा,भाजपा जेष्ठ कार्यकर्ता आणि अतिदक्षता समिती चे सदस्या शोभाताई इंगोले, माविम चे अध्यक्षा सौ.वंदनाताई कुटे, मा.राज वर्मा सर आदिंची उपस्थिती होती. युनिसेफ महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावात महीलांनी स्वयं रोजगार कार्यक्रम कोव्हीड-१९ विषयी जनजागृती व मास्क विक्री करण्यात आली.

या कार्यक्रमाला कोव्हीड-१९ ची तिसरी लाट म्हणजेच ‘डेल्टा प्लस’ येणार आहे त्याबद्दल मा.श्री.ठाणेदार चौबे सरांनी उत्कृष्ट रित्या मार्गदर्शन केले व कोव्हीड चे नियमांबद्दल आवर्जुन सांगितले की,ज्या जन सामान्यांसाठी आज लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे,त्यांनी आता सनासुदीच्या दिवसामध्ये कोव्हीड चे नियम पाळलेच पाहीजे,ज्या लोकांना कोव्हीड च्या नियमांची कदाचीत विसर पडली असेल,अश्या लोकांसाठी हे ‘युनिसेफ’ महिलां आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जे जनजागृती छोटेखानी कार्यक्रम घेत आहेत त्यांचे मनापासुन धन्यवाद आणि पुन्हा एकदा जनसामान्य लोकांना नियमांची आठवन करुन द्यावी लागेल आणि असे कार्यक्रम प्रत्येक जागी घ्यायला हवे अश्या शुभेच्छा ही दिल्यात, त्याचबरोबर सौ.भोयर मॅडम, सौ.संतोषीताई, शोभाताई, सौ.वंदुताई, सौ.संगिताताई आत्राम यांनी अल्प वेळा मध्ये फार मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.रंजनाताई देशकर,आभार प्रदर्शन सौ.संध्याताई जवालकर यांनी केले. सदर कार्यक्रम सौ.वंदनाताई यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले आहे.