दीक्षित तलावाच्या बाजूला निर्मित अत्याधुनिक शौचालय तात्काळ सुरु करा*

53

*दीक्षित तलावाच्या बाजूला निर्मित अत्याधुनिक शौचालय तात्काळ सुरु करा*

दीक्षित तलावाच्या बाजूला निर्मित अत्याधुनिक शौचालय तात्काळ सुरु करा*
दीक्षित तलावाच्या बाजूला निर्मित अत्याधुनिक शौचालय तात्काळ सुरु करा*

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५

*भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची निवेदनातून मागणी*

गुरुवार 30 सप्टेंबर रोजी दीक्षित तलावाच्या बाजूला निर्मित अत्याधुनिक शौचालय तात्काळ सुरु करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना निवेदनातून केली आहे.
घुग्घुस वस्तीतील दीक्षित तलावाच्या बाजूला घुग्घुस ग्रामपंचायत मध्ये भाजपाची सत्ता असतांना अत्याधुनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली होती. या शौचालयाच्या परिसरात गोर गरिबांची घरे आहेत हे शौचालय सुरु नसल्याने शेजारील नागरिक रस्त्याच्या कडेला शौचालयास जातात त्यामुळे रस्त्यावर घाण पसरत आहे अनेक आजार पसरत आहे.
या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घुग्घुस वस्तीच्या मध्य ठिकाणी हे शौचालय आहे दर रविवारी आठवडी बाजार भरतो बाजारात ये-जा करणारे नागरिक याच रस्त्याने जातात हे शौचालय सुरु झाल्यास गोर गरीब नागरिकांना लाभ होणार आहे. घुग्घुस नगर परिषदेची निर्मिती होऊन 9 महिने झाले आहेत तरी सुद्धा हे शौचालय सुरु झाले नाही त्यामुळे हे अत्याधुनिक शौचालय तात्काळ सुरु करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याप्रसंगी भाजपाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अर्शीया जुही यांच्याशी चर्चा केले त्यांनी लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन भाजपाच्या शिष्टमंडळास दिले.
निवेदन देतांना भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे जेष्ठ नेते संजय तिवारी, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे विनोद चौधरी, शाम आगदारी, अजय आमटे, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, सतीश कामतवार, मंगेश पचारे, गुड्डू तिवारी, विनोद जंजर्ला, विकास बारसागडे, अक्षय लठ्ठा उपस्थित होते.