सुदृढ आरोग्यासाठी रक्तदान गरजेचे : प्रा.अतुल देशकर. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ५० नागरिकांनी केले रक्तदान. शेकडो नागरिक व विद्यार्थ्यांनी केली रक्त गट तपासणी सेवा समर्पण अभियानांतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी तालुक्याचा यशस्वी उपक्रम.

सुदृढ आरोग्यासाठी रक्तदान गरजेचे : प्रा.अतुल देशकर.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ५० नागरिकांनी केले रक्तदान. शेकडो नागरिक व विद्यार्थ्यांनी केली रक्त गट तपासणी

सेवा समर्पण अभियानांतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी तालुक्याचा यशस्वी उपक्रम.

अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपुरी : ३०/९/२१

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने तालुक्यातील चौगाण येथे रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या सेवा समर्पण अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार, भाजपा नेते प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाला प्रामुख्याने पं. स सभापती तथा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रा.रामलाल दोनाडकर, माजी सभापती सौ. प्रणाली मैंद, भाजपा नेते प्राचार्य अरुण शेंडे, भाजपा जिल्हा सचिव माणिक पा. थेरकर, डॉ. कळसकर, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोपाल ठाकरे, चौगाणचे सरपंच उमेश धोटे, माजी जि.प सदस्य रामू निहाटे उपस्थित होते.

डॉ. हेडगेवार रक्त पेढीच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. चौगाण सहित तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांनी यात रक्तदान केले. या सोबतच चौगाण ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रक्तगट तपासणी करत स्वतःचा रक्तगट जाणून घेतला. नागरिकांसह लहान मुलांनी सुद्धा रक्तगट तपासणी करत जनजागृती केली.

या कार्यक्रमाला मदन मैंद, प्रमोद मैंद, युवा नेते यशवंत आंबोरकर, सुभाष नन्नावरे, युवा नेते ज्ञानेश्वर दिवठे, अविनाश मस्के,रनमोचनचे उपसरपंच सदाशिव ठाकरे, हळदेचे सरपंच दौलत गरमळे, वामन मैंद, उमेश पुराम, दिनेश कुथे, नितेश पत्रे, मुन्ना दोनाडकर, अतुल बुराडे, भोजराजी चंदनबावणे, उत्तम चौधरी, भाजपा सोशल मीडिया सेलचे तालुका संयोजक धीरज पाल, सहसंयोजक पिंटू आंबोरकर, सहसंयोजक सचिन मेश्राम यांच्या सह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्य. सदस्य लिलाराम राऊत, युवा नेते विनोद बुराडे, श्रीहरिजी बुराडे यांनी प्रयत्न केले.

डॉ. हेडगेवार रक्त पेढीचे प्रवीणजी करंकाळ व चमूने विशेष सहकार्य करत कार्यक्रम यशस्वी केला.