वर्धा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने आज गांधी जयंती दिनी साखळी उपोषण करण्यात आले.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा :- पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने आज गांधी जयंती दिनी 02 आक्टोबर (शनिवार) रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ सिव्हिल लाईन, वर्धा येथे १७ व्या दिवशी साखळी उपोषण करण्यात आले आहे. पेट्रोल पंप हटाव कृती समितीचे नेते नीरज गुजर, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, सुनिल वनकर, मोहन वनकर यांना यावेळी वर्धा शहर पोलिसांनी अटक केली. आंबेडकरी संघटना कार्यकर्त्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा जयघोष करुन पोलिस प्रशासनाचा पेट्रोल पंप स्थलांतरित करण्याची मागणी केली.
