राजुरा येथिल तरुणांचा युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश.

✒निखिल पिदूरकर✒
कोरपणा तालुका प्रतिनिधी
9067769906
राजुरा:- सविस्तर वृत्त असे की युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूरजभाऊ ठाकरे यांच्या युवा नैतृत्वाला आकर्षित होऊन तथा आत्तापर्यंत राजुऱ्यातील झालेला शून्य विकास व तरुणांना रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन तरुणांची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांना पाठ दाखवत “तरुणांना रोजगार निर्मिती व उद्योग धंद्यांकडे कल वाढविणारे व कामगारांवर होणारा अन्याय वेळोवेळी दूर करणारे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन दिनांक 5 ऑक्टोबर ला युवा स्वाभिमान पार्टी राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये तरुणांचा युवा स्वाभिमान पक्षात जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला व त्याचबरोबर पक्षाशी जुळलेल्या नवीन सदस्यांनी आपल्या तालुक्यातील व गावातील विविध समस्या जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना सांगितल्या व जिल्हाध्यक्षांनी लवकरच सदर नागरिकांना समस्या मार्गी लावण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
या वेळी प्रवेश करणारे भुवन काळे, गौरव पोहनकर, शिवजत देवल, सुरेंद्र चौधरी आदींनी यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आल्वीन सावरकर, ऑस्टिन सावरकर, निखिल बजाईत, राहुल चौहान, अजवान टाक,भूपेश साठोने, जलाल बियाबानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.