महाराष्ट्र बंद: केंद्र सरकारचा गोंडपिपरीत बाईक रॅली द्वारे निषेध.
राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात लखीमपुर येथे चालू असलेल्या शांतप्रिय आंदोलनकर्त्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडीने चिरडन्यात आले.देशाच्या इतिहासात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली. त्या निषेधार्थ दि.११ सोमवारी महाविकास आघाडीतर्फे गोंडपीपरित शिवाजी चौक ते तहसील कार्यालय बाईक रॅली काढून बंद ची हाक देत निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, राट्रवादी तालुका कार्या ध्यक्ष नितेश मेश्राम काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा रेखाताई रामटेके,बाजार समिती सभापती सुरेश चौधरी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील संकुलवार, शिवेसना तालुका प्रमुख नितीन धानोरकर, जेष्ठ कार्यक्रर्ते वासुदेव सातपुते, काँ अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष गौतम झाडे, काँग्रेस शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, काँग्रेस जिल्हा महासचिव कमलेश निंमगडे, उपसरपंच बालाजी चंनकापुरे, सरपंच पोचमलु उलेंदला, शिवसेना शहर उपप्रमुख रियाज कुरेशी, बब्बू पठाण, अशपाक कुरेशी, रमेश नायडू, आनंदराव गोहणे, शिवसेना तालुका संघटक शैलेश बैस, गिरीधर दिवसे, प्रमोद दुर्गे, पुरुषोत्तम वाघ, बबलू कुळमेथे, वासुदेव नगारे, राजीव सिंह चंदेल, शंभू येलेकर,विवेक राणा, आशीर्वाद पिपरे, तुकाराम सातपुते, शुभम भोयर, भारत देवतळे यांच्यासह शेकडो महा विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.