भाजपाच्या वतीने हिंगणघाट ते खडसंगी रस्ता निर्मितीसाठी नंदोरी येथे चक्का जाम आंदोलन.

51

अक्षय बहादे
समुद्रपुर तालुका प्रतिनिधी

समुद्रपूर,दि.12 ऑक्टो:- हिंगणघाट, सावली, नंदोरी, कोरा, खडसंगी मंजूर रस्त्याचे वर्क ऑर्डर काडून रस्त्याच्या कामाला सुरुवात करा. अन्यथा 12 ऑक्टोबर ला चंद्रपूर-नागपूर मार्गावरील चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने बांधकाम विभागाला दिले आहे.

16 जुलै आणि त्या अगोदर ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली होती .
मात्र निवेदनाची दखल घेतली नसल्याने शेवटी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे ,तालुका अध्यक्ष संजय डेहने यांच्या नेतृत्वात आज आंदोलन होणार आहे. 8 ऑक्टोबर ला समुद्रपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिल्या गेले.

हिंगणघाट, सावली, कोरा, खडसंगी, नंदोरी वर्क ऑर्डर काडून रस्त्याच्या बांधकामाला सुरवात करा ,अन्यथा 12 तारखीला चंद्रपूर-नागपूर मार्गावरील नंदोरी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.

नंदोरी येथील होणाऱ्या चक्का जाम आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आव्हान भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय डेहणे यांनी केले आहे.