धाबा ग्राम पंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी सौ नंदाताई दिलीप हजारे यांची बिनविरोध निवड.

राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- आज दिनांक १२/१०/२०२१ श्रीक्ष्रेत्र धाबा ग्रामपंचायतीची ग्रामसभा श्री संत परमहंस कोंडया महाराज मंदिर येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली. ग्रामसभेत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. विविध योजनांची माहिती देण्यात आली. महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष निवडण्याचा विषय आला. त्यात तीन नावे आलेत दोघे माघार घेतले. सौ नंदाताई दिलीप हजारे यांची तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली.
संत नगरीत पहिलीच महिला तंटामुक्ती अध्यक्ष सौ. नंदाताई दिलीप हजारे हिचे भारतीय जनता पार्टी धाबा व ग्रामस्थांकडून कडुन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.