वारकरी संप्रदायाचे सामाजिक योगदान मोलाचे: ॲड. वामनराव चटप* *वारकरी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार*

44

*वारकरी संप्रदायाचे सामाजिक योगदान मोलाचे: ॲड. वामनराव चटप*

*वारकरी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार*

वारकरी संप्रदायाचे सामाजिक योगदान मोलाचे: ॲड. वामनराव चटप* *वारकरी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार*
वारकरी संप्रदायाचे सामाजिक योगदान मोलाचे: ॲड. वामनराव चटप*
*वारकरी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार*

*कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906*
राजुरा : राजुरा तालुक्यातील कळमणा येथे आदर्श शारदा महिला मंडळाने गावातील वारकऱ्यांचा सत्कार आयोजित केला. आजच्या विज्ञानयुगात आध्यात्माचा विसर पडता कामा नये असे मत माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी मांडले. यावेळी ॲड. दीपक चटप, शेषराव बोंडे, नरेंद्र मोहारे आदींची विशेष उपस्थिती होती.

पुढे बोलताना ॲड. वामनराव चटप म्हणाले की, वारकरी संप्रदायाने समतेचा विचार समाजात रुजिविला. उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा, घरे, पायाभूत सुविधा मिळणे हा आपला हक्क आहे. आई वडिलांची सेवा करणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहणे आपले कर्तव्य समजावे. हक्कासोबत कर्तव्याची जागृती आवश्यक आहे.

विशेष अतिथी म्हणून उपस्थित ॲड. दीपक चटप यांनी संतांचा विचार हा समाजाला सकारात्मक दिशा देणारा आहे. समाजव्यवस्थेत महिलांचे स्थान महत्वाचे आहे. आई, सासू, सून, मुलगी आदी भूमिकांतून समजाला पुढे नेण्याचे काम महिला करत असतात. कळमणा येथे शारदा महिला मंडळाने गावातील वारकऱ्यांचा सत्कार करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला असल्याचे मांडले.

आदर्श शारदा महिला मंडळ कळमनाचे अध्यक्ष शारदा वांढरे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेंडे सुधाकर पिंपळशेंडे , निलेश वाढई, मंगेश ताजने, कवडू गौरकर, प्रभाकर साळवे, साईनाथ शेरकी, मधुकर लडके, योगराज वांढरे, मयूर गौरकार, राकेश ठवरी, सचिन विरुटकर यांच्यासह कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेंडे यांनी केले.

—————————————-