कृषीपीडिया शेतकऱ्यांनो घाबरू नका; पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? पंजाबराव डख यांनी सांगितले काही इंडिकेटर

54

कृषीपीडिया
शेतकऱ्यांनो घाबरू नका; पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? पंजाबराव डख यांनी सांगितले काही इंडिकेटर

कृषीपीडिया शेतकऱ्यांनो घाबरू नका; पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? पंजाबराव डख यांनी सांगितले काही इंडिकेटर
कृषीपीडिया
शेतकऱ्यांनो घाबरू नका; पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? पंजाबराव डख यांनी सांगितले काही इंडिकेटर

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? पंजाबराव डख यांनी सांगितले काही इंडिकेटर
परंतु १९९५ नंतर उद्योगधंदे वाढले, मोठी शहरे वसली यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने निसर्गाने रौद्र रूप धारण केले. परिणामी पाऊस रूसला अन् महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली. मात्र सध्या पृथ्वीवरील तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण देखील वाढले असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले.
बोधेगाव (ता शेवगाव) येथील व्यंकटेश उद्योग समुहाच्या सुखायू तर्फे घेण्यात आलेल्या मोबाईल अॅपचे लोकार्पण व भव्य शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी पंजाबराव डख यांनी यांनी शेतकऱ्यांना पावसाचे संकेत ओळखण्यासाठी काही खास निसर्गाचे इंडिकेटर सांगितले आहेत. ते सांगत असतात डख म्हणाले, मी काही कुठल्याही विद्यापीठात याचे शिक्षण घेतलेले नाही. मात्र १० ते १५ वर्षे एका एका बाबीवर सूष्म अभ्यास केला,
तेव्हा कुठे तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो. काळजी करू नका, १५ दिवस आधीच मी तुम्हांला पावसाची माहिती देत राहील अन् तुमचे नुकसान होऊ देणार नाही.
काय आहेत निसर्गाचे संकेत…
घरातील लाईट, बल्ब, ट्युब भोवती किडे, पाकुळ्या आल्यातर समजावे पुढील ७२ तासांत पाऊस पडणार आहे.
वारा बंद होणे, सरपटणारे प्राणी बिळातून बाहेर पडू लागले, गर्मी जास्त जाणवू लागली तर समजावे पाऊस पडणार आहे.
पावसाळ्यात दिवस मावळत असताना, पश्चिमेस सायंकाळच्या वेळेला आकाश लालसर, तांबडे दिसले तर जुने लोक बी पडलं असे म्हणायचे. अशावेळी ७२ तासांत पाऊस पडणार समजावे.
चिमण्यांनी घरासमोरील अंगणातील धुळमातीत आंघोळ केल्यास ७२ तासांत पाऊस पडणार समजावे.