कोण आहेत त्या नवाब मलिकांच्या लेडी डॉन? काय आहे त्यांची या प्रकरणी संबंध.

55

कोण आहेत त्या नवाब मलिकांच्या लेडी डॉन? काय आहे त्यांची या प्रकरणी संबंध.

कोण आहेत त्या नवाब मलिकांच्या लेडी डॉन? काय आहे त्यांची या प्रकरणी संबंध.
कोण आहेत त्या नवाब मलिकांच्या लेडी डॉन? काय आहे त्यांची या प्रकरणी संबंध.

✒️मुंबई महानगर प्रतिनिधी✒️
मुंबई:-  राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे प्रकरणी महाराष्ट्रात सध्या खुप गाजत आहे. त्यांच्या मधात आरोप प्रत्यारोप फैरी सुरु असुन राजकारण चांगलच गरम झाल्याचे चित्र आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज परत एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या घाणाघाट आरोप केला. यावेळी नवाब मलिक यांनी पंचाच्या मुद्द्यावरून वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच त्यांनी एका लेडी डॉनचा उल्लेखही केला. या लेडी डॉनशी तुमचा संबंध काय? या लेडी डॉनचे बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे ही लेडी डॉन कोण आहे? असा सवाल केला जात आहे.

मंत्री नवाब मलिक नेमके काय बोलले?

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लेडी डॉनच्या मुद्दयावरून वानखेडेंना काही प्रश्न केले. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? मुंबईत काही खेळ सुरू आहे का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. माय सिस्टर लेडी डॉन नावाने टॅग करत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे हे त्यांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले.

या लेडी डॉनची बॉलिवूडमध्ये दहशत?

तसेच पुढे बोलताना मलिक यांनी सीआरपीसी कायद्यात एकच पंच वारंवार घेतला जात असेल तर केसेसमध्ये दम नसतो अनेकदा हे कोर्टाने सांगितलं आहे. या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे झाले यांचं उत्तर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे रॅकेट काय आहे? लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का?, असा सवाल त्यांनी केला. या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे यास्मिन वानखेडे आणि एनसीबीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईंचा संबंध आहे का ? असा प्रश्न जनसामान्यांमधून विचारला जात आहे.

कोण आहेत यास्मिन वानखेडे?

मंत्री नवाब मलिक यांनी ज्यांचा लेडी डॉन असा उल्लेख केला. त्यांचं नाव यास्मिन वानखेडे असं आहे. यास्मिन वानखेडे या समीर वानखेडे यांच्या बहीण आहेत. यास्मिन या पेशाने वकील असुन त्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षा असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच कायदेशीर कामही पाहतात. तसेच त्या महिलांच्या विविध समस्या सोडवण्याचेही काम करतात.